पाकिस्तानातील एअर बेस, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणाऱ्या हवाई दल अधिकाऱ्यांना वीरचक्र

ऑपरेशन सिंदूरमधील कामगिरीबद्दल गौरव

पाकिस्तानातील एअर बेस, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणाऱ्या हवाई दल अधिकाऱ्यांना वीरचक्र

पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर आणि लष्करी साधनसंपत्तीवर केलेल्या अचूक हल्ल्यांसाठी हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या शूर जवानांना वीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. या मोहिमांमध्ये मुरिदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयांवर अचूक हल्ले करण्यात आले, तसेच किमान सहा पाकिस्तानी विमाने पाडण्यात आली.

वीर चक्र मिळवणाऱ्यांमध्ये ग्रुप कॅप्टन रणजीत सिंग सिधू, ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा (SC), ग्रुप कॅप्टन अनीमेष पाटणी, ग्रुप कॅप्टन कुनाल कालरा, विंग कमांडर जॉय चंद्रा, स्क्वॉड्रन लीडर सार्थक कुमार, स्क्वॉड्रन लीडर सिद्धांत सिंग, स्क्वॉड्रन लीडर रिझवान मलिक आणि फ्लाइट लेफ्टनंट आरशवीर सिंग ठाकूर यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी सीमेपार उच्च मूल्य असलेल्या लक्ष्यांवर नेमके हल्ले करण्यासह हवाई संग्रामातही महत्त्वाची भूमिका बजावली.

याशिवाय, चार वरिष्ठ हवाई दल अधिकाऱ्यांना — हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल नर्नदेश्वर तिवारी, पश्चिम हवाई कमांडर एअर मार्शल जितेंद्र मिश्रा, DG एअर ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश भारती आणि एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल बी. चंद्रशेखर — यांना मोहिमेदरम्यान नेतृत्व आणि धोरणात्मक देखरेखीबद्दल सर्वोत्तम युद्ध सेवा पदक (Sarvottam Yudh Seva Medal) देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सोन्यासारखी घरं आहेत ती विकू नका!

सिलिकॉन वेफर्स… महासत्तांना भारताच्या गतीचे भय का वाटते ?

जम्मू आणि काश्मीर: हंडवाऱ्यात तीन दहशतवादी साथीदारांना अटक!

एसएंडपी ग्लोबलने भारताला काय रेटिंग दिले ?

एकूण २६ हवाई दल अधिकारी आणि जवानांना पाकिस्तानस्थित दहशतवादी तळांवर हल्ले करण्यासाठी आणि S-400 सहित प्रगत हवाई संरक्षण प्रणाली हाताळून शत्रूचे सर्व हल्ले रोखल्याबद्दल वायु सेना पदक (गॅलंट्री) मिळाले.

तसेच १३ हवाई दल अधिकाऱ्यांना आक्रमक हल्ले राबवणे आणि भारतीय हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्यातील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी युद्ध सेवा पदक देण्यात आले. यामध्ये एअर व्हाइस मार्शल जोसेफ सुवारेस, एअर व्हाइस मार्शल प्रज्वल सिंग आणि एअर कमोडोर अशोक राज ठाकूर यांचा समावेश आहे.

भारतीय लष्करातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक मिळाले. स्वातंत्र्य दिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या शौर्य पुरस्कारांच्या यादीत चार कीर्ती चक्र, चार वीर चक्र आणि आठ शौर्य चक्रांचा समावेश असून, हे पुरस्कार तिन्ही दलांतील असामान्य शौर्याला मान्यता देतात.

Exit mobile version