श्रेयस अय्यरला संधी द्यायला हवी होती!

श्रेयस अय्यरला संधी द्यायला हवी होती!

आगामी एशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने १९ ऑगस्ट रोजी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला. मात्र, मधल्या फळीतला दमदार फलंदाज श्रेयस अय्यर याला संघात स्थान मिळाले नाही. यावर माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी नाराजी व्यक्त केली असून, किमान रिजर्व खेळाडू म्हणून तरी अय्यरला संघात ठेवायला हवे होते, असे मत त्यांनी मांडले.

आकाश चोप्रा यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले की –
“श्रेयसने शॉर्ट बॉलविरुद्धची कमजोरी सुधारली आहे. स्पिन उत्तम खेळतो. आयपीएलमध्ये १७५ स्ट्राइक रेटने ६०४ धावा केल्या आणि पंजाब किंग्जला फायनलमध्ये पोहोचवलं. तरीसुद्धा मुख्य संघात किंवा रिजर्व यादीत नाव नसणं धक्कादायक आहे.”

त्यांनी पुढे सांगितले –
“रिजर्व खेळाडूंच्या यादीत यशस्वी जायसवाल, ध्रुव जुरेल, प्रसिद्ध कृष्णा आहेत. पण इथेही श्रेयसचा उल्लेख नाही. खरं तर त्याला या यादीत तरी असायला हवे होते.”

आकाश चोप्रा यांचे मत –
“श्रेयसने जे काही केलंय, त्याहून अधिक एखादा खेळाडू काय करणार? आयपीएलमध्ये ६००+ धावा, पंजाबला फायनल, सय्यद मुश्ताक अलीत धावा, रणजीत खेळून विजेतेपद, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली… एवढं करूनही जर संधी मिळाली नाही, तर अजून काय करावं लागेल?”

चोप्रा यांनी स्पष्ट केलं की हा केवळ एशिया कप आहे, याचा थेट विश्वचषक निवडीशी संबंध जोडता कामा नये. त्यांचा विश्वास आहे की श्रेयस अय्यर जर वनडे फॉरमॅटमध्ये सातत्य ठेवला, तर तो २०२६ टी-२० विश्वचषक संघात नक्की असेल.

📊 श्रेयस अय्यरची T20I आकडेवारी :

Exit mobile version