पहलगाम हल्ल्यानंतर सशस्त्र दलांनी दहशतवादविरोधी कारवाया वाढवल्या आहेत, १०० दिवसांत १२ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. खात्मा करण्यात आलेल्या १२ दहशतवाद्यांपैकी सहा पाकिस्तानी दहशतवादी होते, तर उर्वरित जम्मू-काश्मीरमधील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेले स्थानिक दहशतवादी होते. याशिवाय, ६-७ मे दरम्यान ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी सैन्याने १०० हून अधिक दहशतवादी मारले होते.
मे महिन्यापासून सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात अनेक मोहिमा सुरु केल्या, त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘ऑपरेशन महादेव’, ज्यामध्ये पहलगाम हल्ला करणारे तीन दहशतवादी मारले गेले. २८ जुलै रोजी, श्रीनगरच्या दाचीगाम परिसरात लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तैयबाचे (एलईटी) दहशतवादी सुलेमान, अफगाण आणि जिब्रान मारले गेले.
दुसऱ्याच दिवशी, ‘ऑपरेशन शिवशक्ती’ नावाची आणखी एक मोहीम राबवण्यात आली, यामध्ये लष्कराने आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्या आठवड्यात चार मोठ्या दहशतवादविरोधी कारवाया सुरू करण्यात आल्या. या कारवाया प्रामुख्याने दक्षिण काश्मीरमध्ये केंद्रित होत्या, ज्यात शोपियान आणि पुलवामा यांचा समावेश होता. मे महिन्याच्या मध्यानंतर आणखी दोन महत्त्वाच्या कारवाया सुरू झाल्या.
हे ही वाचा :
शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी – गावस्कर आणि सोबर्सच्या विक्रमांवर मोहर!
मालेगाव स्फोट प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना अटक करण्याचे आदेश होते!
Ganpati Special Train: एलटीटी – मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन
रुग्णालयात उंदराने रुग्णाला कुरतडलं
यानंतर शोपियानच्या केलर जंगलात झालेल्या कारवाईत तीन लष्कर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. १५ मे रोजी त्रालच्या नादेर भागात झालेल्या आणखी एका कारवाईत आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दरम्यान, सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम राबवत कारवाई सुरूच आहे.
