पोटातल्या गर्भाच्या द्राक्षाएवढ्या हृदयावर शस्त्रक्रिया

पोटातल्या गर्भाच्या द्राक्षाएवढ्या हृदयावर शस्त्रक्रिया

दिल्ल्लीच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी एक अतिशय नाजूक अशी शस्त्रक्रिया केली आहे. हि शस्त्रक्रिया महिलेच्या गर्भाशय वाढणाऱ्या गर्भावर करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया अवघ्या काही सेकंदात यशस्वी करून दाखवली आहे.

एम्सच्या डॉक्टरांनी केलेल्या या दुर्मिळ शस्त्रक्रियेची देशभर चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल आनंद व्यक्त करताना एम्सच्या डॉक्टरांचे कौतुक केले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही २८ वर्षीय महिला याआधी तीन वेळा गर्भवती राहिली होती. परंतु प्रत्येक वेळी जन्मलेल्या बाळाला हृदयाची समस्या येत होती आणि त्याला वाचवता आले नाही. यावेळी डॉक्टरांनी महिलेला आणि तिच्या पतीला गर्भातील बाळाची परिस्थिती सांगितली आणि शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार न जन्मलेल्या बाळाला हृदयविकाराचा काही गंभीर आजार झाल्यास तो गर्भातच बरा होऊ शकतो.

द्राक्षाच्या आकाराच्या हृदयातील व्हॉल्व्ह उघडला

एम्सच्या डॉक्टरांनी महिलेच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाच्या हृदयावर अवघ्या ९० सेकंदात शस्त्रक्रिया केली. या गर्भाच्या हृदयामध्ये ब्लॉकेज झाले होते. डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंडच्या मदतीने गर्भवती महिलेच्या पोटात सुई टाकून अवघ्या ९० सेकंदात गर्भाच्या द्राक्षाच्या आकाराच्या हृदयातील व्हॉल्व्हचा ब्लॉकेज उघडला. दिल्लीतील कार्डिओथोरॅसिक सायन्सेस सेंटरमध्ये झालेल्या या शस्त्रक्रियेमध्ये द्राक्षाच्या आकाराचे ब्लॉकेज दूर करण्यात आले. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून आता आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंच्या मशालीतला आणखी एक निखारा निघाला…दीपक सावंत एकनाथ शिंदेंकडे

‘राम- सीता’ ३५ वर्षानंतर पुन्हा आले एकत्र…

राहुल गांधी आज येणार संसदेत, लंडनमधील भाषणाबद्दल बोलणार का?

तुषार मेहतांनी नेमके काय सुचवले?

पंतप्रधान मोदींनी डॉक्टरांचे केले कौतुक

बुधवारी पीएम मोदींनीही या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल आनंद व्यक्त करताना एम्सच्या डॉक्टरांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, देशाला आपल्या डॉक्टरांच्या कौशल्याचा आणि कल्पकतेचा अभिमान आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या ट्विटला रिट्विट करताना त्यांनी ही माहिती दिली.

Exit mobile version