अलांडमध्ये मत चोरण्याचा आरोप: भाजपा म्हणाली- ‘एकही मत हटवलं नाही’

भाजप नेते हर्षानंद गुट्टेदार यांचा पलटवार 

अलांडमध्ये मत चोरण्याचा आरोप: भाजपा म्हणाली- ‘एकही मत हटवलं नाही’

कर्नाटकमधील अलांड मतदारसंघात मत चोरीच्या आरोपांवरून निर्माण झालेल्या वादानंतर, भाजप नेते हर्षानंद गुट्टेदार यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. एएनआयशी बोलताना ते म्हणाले, “मी आज राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहिली. निवडणूक आयोगाने जे म्हटले आहे ते पूर्णपणे खरे आहे. एकही मत वगळण्यात आले नाही. प्रत्येक समुदायात काँग्रेसची मते कमी होत आहेत. म्हणूनच ते हे खोटे आरोप करत आहेत.

अलांडमध्ये अनेक लोक भाजपमध्ये सामील झाले आहेत. जर आज अलांडमध्ये निवडणूक झाली तर भाजप २०,००० पेक्षा जास्त मतांनी विजयी होईल. आम्हीही यापूर्वी निवडणूक आयोगाला चौकशीसाठी पत्र लिहिले होते. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, या प्रकारे मत हटवता येत नाहीत. काँग्रेस केवळ जनतेला दिशाभूल करण्यासाठी खोटे आरोप करत आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, अलांड विधानसभा मतदारसंघ २०१८ मध्ये भाजपचे सुभाष गुट्टेदार यांनी जिंकला होता, तर २०२३ मध्ये तो काँग्रेसचे बी. आर. पाटील यांनी जिंकला.

दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीचा आरोप केला. त्यांनी मतचोरीचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा दावा केला होता, परंतु आज (१८ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले की हायड्रोजन बॉम्ब येत आहे. राहुल गांधी यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दोन मतदारसंघांमध्ये मतचोरीचा दावा केला.

हे ही वाचा : 

मोदींच्या वाढदिवशीच माँसाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होण्यामागे षडयंत्र!

छत्तीसगड: ५ लाखांची इनामी महिला आणि ७ लाखांचे दोन नक्षलवादी चकमकीत ठार! 

सरन्यायाधीश गवई यांनी भगवान विष्णू मूर्तीबाबत केलेल्या विधानावर दिले स्पष्टीकरण; काय म्हणाले?

गडकिल्ले, देवी– देवतांच्या नावाने सुरू असलेल्या बारच्या नावांमध्ये बदल करण्यासाठी उपोषण 

ते म्हणाले, “कर्नाटकच्या अलांड मतदारसंघातील ६,०१८ मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मतदारांची नावे वगळण्यासाठी कर्नाटकाबाहेरील मोबाईल नंबर वापरण्यात आले. ते म्हणाले की जेव्हा मते वगळली जातात तेव्हा विरोधकांना लक्ष केले जाते. ज्या भागात काँग्रेस मजबूत आहे त्या भागातील मतदारांना लक्ष केले गेले आहे.”

Exit mobile version