‘शोले’ चित्रपटातून सहकलाकार आणि जवळचा मित्र असलेल्या धर्मेंद्र यांचे सोमवारी निधन झाल्यानंतर, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आठवणी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केल्या.
सोमवारी दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनानंतर, संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीतून श्रद्धांजली आणि आठवणींचा वर्षाव झाला. अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांनी हृदयस्पर्शी संदेश लिहिले. सोमवारी रात्री २.३० वाजता अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर मित्रासाठी भावनिक संदेश लिहिला. अमिताभ आणि धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटांत एकत्र भूमिका करून त्या अजरामर केल्या.
शोलेमध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत काम करणाऱ्या अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले, आणखी एक महान अभिनेता आपल्याला सोडून गेला, रंगभूमी सोडून गेला, मागे ठेवून गेला एक अशी शांतता, जी असह्य आहे.”
हे ही वाचा:
धर्मेंद्र म्हणजे चांगुलपणाचं प्रतीक
पाकिस्तानचा पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला; ९ मुलांसह महिलेचा मृत्यू
हम तुम जुदा ना होंगे…अलविदा धर्मेंद्र
पाण्याऐवजी जेवण शिजवण्यासाठी टाकले ऍसिड, आणि…
धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना अमिताभ पुढे म्हणतात, धरमजी, महानतेचे प्रतीक, केवळ त्यांच्या प्रसिध्द शारीरिक व्यक्तिमत्त्वासाठी नव्हे, तर त्यांच्या विशाल हृदयासाठी, नि:स्वार्थ साधेपणासाठी ओळखले गेले. त्यांनी पंजाबमधील आपल्या गावाची माती, त्याची निरागसता, आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जपली. चित्रपटसृष्टी दशकानुसार बदलत गेली, पण ते मात्र तसेच राहिले. त्यांचे हास्य, त्यांचं आकर्षण, त्यांचं ऊबदारपण—ज्यांची छाया ज्यांच्यावर पडली त्यांनी ते अनुभवलं. हे व्यावसायिक क्षेत्रात फार दुर्मीळ आहे.”
अमिताभ आणि धर्मेंद्र यांनी प्रथम दोस्त (१९७४) मध्ये एकत्र काम केले आणि त्यानंतर चुपके चुपके आणि शोले (१९७५) सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. पुढे त्यांनी नसीब, राम बलराम आणि हम कौन हैं यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले. श्रद्धांजलीच्या शेवटी अमिताभ भावनिकपणे लिहितात, “आपल्या सभोवतालीचे वातावरण रिक्त झाल्यासारखे आहे, ही पोकळी कायम राहील.”
हे ही वाचा:
हक्काचा मतदार देश सोडून चालला ममतांचा रक्तदाब वाढला…
मलेशियात १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी?
पाण्याऐवजी जेवण शिजवण्यासाठी टाकले ऍसिड, आणि…
हिंदी चित्रपटसृष्टीचा रांगडा अभिनेता धर्मेंद्र कालवश
धर्मेंद्र यांचे सोमवारी सकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही आठवड्यांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते आणि या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही माध्यमांनी १० नोव्हेंबरला त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवल्या होत्या, पण कुटुंबीयांनी त्या नाकारल्या. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि काही दिवसांनी ते घरी परतले. २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी जुहू येथील आपल्या निवासस्थानी अंतिम श्वास घेतला. त्यानंतर पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
