महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार जोरदार सुरू असतानाच उमेदवारीची अपेक्षा असलेले पण तिकीट न मिळालेल्यांकडेही लक्ष लागू आहे. राजकीय वातावरण तापलेलं असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. एमआयएम पक्षातील नाराज गटाकडून इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. धावत्या कारच्या मागे पळून जलील यांना बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांचा प्रचार सुरू असतानाच ही घटना घडली आहे. त्यांच्या वाहानावर हल्ला करण्यात आला तेव्हा ते गाडीतच असल्याची माहिती समोर आली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे, महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं. नव्या लोकांना संधी देण्यात आली, असा आरोप करत नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
सुरुवातीला काळे झेंडे दाखवल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. इम्तियाज जलील यांच्या गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाली आहे, अशी माहिती आहे. प्रचार रॅलीच्या दरम्यान बायजीपुरा जिन्सी भागात ही घटना घडली आहे. एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी आहे. इतर जे कार्यकर्ते आहेत, त्या संदर्भात चौकशी सुरु आहे.
हे ही वाचा..
समुद्राखालील जगाचा अनुभव मिळणार! देशातील पहिला पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात
जमावापासून वाचण्यासाठी हिंदू व्यक्तीचा पाण्यात उडी मारल्याने मृत्यू
जवाहरलाल नेहरू यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणास नकार दिला होता
टेम्पोमध्ये गाणी वाजवण्याचा वाद : युवकाची हत्या
इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे की, पोलिसांसमोर हा हल्ला झाला असून आता पोलीस दोषींवर काय कारवाई करणार हे पाहणार आहे. परवानगी घेऊन पदयात्रा सुरू होती. तेव्हा काही गुंडांनी हा हल्ला केला. त्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. लोकशाही पद्धतीने निवडणूक लढायला हवी, असे मत जलील यांनी व्यक्त केले आहे.
