पंतप्रधान मोदींचे स्वातंत्र्यदिनाचे आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण, १०३ मिनिटं!

इंदिरा गांधींचा मोडला रेकॉर्ड, नेहरू नंतर दुसऱ्या क्रमांकावर

पंतप्रधान मोदींचे स्वातंत्र्यदिनाचे आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण, १०३ मिनिटं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१५ ऑगस्ट ) ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकावला आणि देशाला संबोधित केले. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींचे आजचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण हे त्यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण होते. यावेळी त्यांनी १०३ मिनिटे प्रभावी भाषण दिले.

पंतप्रधान मोदींनी सकाळी ७.३३ वाजता आपले भाषण सुरू केले आणि सकाळी ९.१६ वाजता संपवले. एवढे मोठे भाषण देवून त्यांनी मागील वर्षीचा स्वताच्याच भाषणाचा रेकॉर्ड मोडला. २०२४ मध्ये त्यांनी ९८ मिनिटे भाषण दिले होते. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून सलग १२ स्वातंत्र्यदिनी भाषणे देऊन इंदिरा गांधींचाही विक्रम मोडला. इंदिरा गांधी यांनी सलग सर्वाधिक ११ स्वातंत्र्यदिनी भाषणे दिली होती (१९६६–१९७६). तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग १७ स्वातंत्र्यदिनी भाषणे दिली होती (१९४७ ते १९६३). त्यानुसार सलग स्वातंत्र्यदिनी भाषण देणाऱ्या नेहरू यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पंतप्रधान मोदींचा नंबर लागला आहे.

आपल्या भाषणात, पंतप्रधानांनी विविध विषयांवर चर्चा केली, सरकारच्या कामगिरीचा सर्वसमावेशक आढावा सादर केला आणि २०४७ पर्यंत नवीन भारत आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनावर आधारित भविष्यासाठीचा रोडमॅप मांडला. पंतप्रधान मोदी यांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण त्यांच्या पूर्वसुरींपेक्षा जास्त लांब होते. (पूर्वसुरींपेक्षा” म्हणजे “पूर्वी आलेल्या लोकांपेक्षा” किंवा “आपल्या आधी कार्यभार सांभाळणाऱ्या व्यक्तींपेक्षा”).  २०२३ मध्ये, मोदींनी त्यांचे सलग १० वे स्वातंत्र्यदिनाचे भाषण दिले, सुमारे ९० मिनिटे भाषण दिले. २०१६ मध्ये लाल किल्ल्यावरून त्यांचे भाषण ९६ मिनिटे चालले, त्यानंतर २०१९ मध्ये ९२ मिनिटांचे भाषण झाले.

पंतप्रधान मोदींपूर्वी, १९४७ मध्ये जवाहरलाल नेहरू आणि १९९७ मध्ये इंद्रकुमार गुजराल यांनी अनुक्रमे ७२ आणि ७१ मिनिटांची सर्वात लांब भाषणे दिली होती. पंतप्रधानांनी २०१५ मध्ये ८५ मिनिटांच्या राष्ट्राला संबोधित करून हा विक्रम देखील मोडीस काढला. मोदींनी २०१४ मध्ये त्यांचे पहिले स्वातंत्र्यदिनी भाषण दिले होते, जे ६५ मिनिटे चालले. तर २०१७ मध्ये स्वातंत्र्यदिनाचे त्यांचे सर्वात लहान भाषण फक्त ५६ मिनिटे होते. 

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला काय दिला संदेश?

मिशन सुदर्शन चक्र; पुढील १० वर्षात उभारणार भारताचे ‘आयरन डोम’

ट्रम्पना इशारा; ‘मोदी भिंतीसारखा उभा, शेतकऱ्यांच्या धोरणांबाबत तडजोड नाही’

स्वातंत्र्यदिवस २०२५ : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १२ वर्षात वेगवेगळे लुक!

दरम्यान, स्वातंत्र्यदिनी सर्वात लहान भाषणे देण्याचा विक्रम नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या नावावर आहे, १९५४ आणि १९६६ मध्ये त्यांनी अनुक्रमे फक्त १४ मिनिटे भाषणे दिली होती. तर मनमोहन सिंग यांचे २०१२ आणि २०१३ मध्ये ३२ आणि ३५ मिनिटे भाषणे होती, तर अटलबिहारी वाजपेयी यांचे २००२ आणि २००३ मध्ये २५ आणि ३० मिनिटे भाषणे होती.

Exit mobile version