दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प, हजारो भाविक अडकले

उत्तराखंडमधील जोशीमठजवळ गुरवार, ५ मे रोजी दरड कोसळल्याचे वृत्त आहे.

दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प, हजारो भाविक अडकले

उत्तराखंडमधील जोशीमठजवळ गुरवार, ५ मे रोजी दरड कोसळल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेमुळे बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे हजारो पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यानंतर प्रशासनाने बद्रीनाथ यात्रा स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. महामार्गावर कोसळलेल्या दरडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जोशीमठजवळील हेलंग खोऱ्यात एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यासाठी जमिनीखाली सुरूंग लावले जात आहेत. अशाच एका सुरुंगामुळे दरड कोसळली असावी, असा अंदाज स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी गौचर, कर्णप्रयाग आणि लंगासूमधील बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर कोसळलेल्या दरडीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संपूर्ण दगड तुटून महामार्गावर पडल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. घटनास्थळी लोक धावताना दिसत आहेत. तर, प्रवाशांची वाहानंही जवळच उभी असलेली दिसत आहेत. सुदैवाने याठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हे ही वाचा:

इम्रान खान यांना धक्काबुक्की, पुन्हा पायाला दुखापत

मणिपूरमध्ये दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश; आंदोलन पेटले

संरक्षण संशोधन तथा डीआरडीओचा शास्त्रज्ञ अडकला हनी ट्रॅपमध्ये

मी दिलेला सल्ला शरद पवारांच्या पचनी पडेल का? उद्धव ठाकरे यांनी मारला टोमणा

“हेलांगमधील बद्रीनाथ रस्ता सुरू झाल्यानंतर प्रवाशांना पुढील प्रवासाची परवानगी देण्यात येईल. तोपर्यंत कोणालाही या महामार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी नसेल,” असे आवाहन सुरक्षेच्या कारणांमुळे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version