“जन्म प्रमाणपत्र घोटाळा: ५०,००० जन्म प्रमाणपत्रे आणि ४७,००० आधार कार्ड रद्द”

भाजपा नेते किरीट सोमय्या यांची माहिती

“जन्म प्रमाणपत्र घोटाळा: ५०,००० जन्म प्रमाणपत्रे आणि ४७,००० आधार कार्ड रद्द”

बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या मोहिमेला यश मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील तहसील कार्यालयांना भेट देत, घुसखोरांना बेकायदेशीरपणे देण्यात आलेल्या जन्म प्रमाणपत्रांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याचे काम ते करत आहेत. अशातच २७सप्टेंबर रोजी नरिमन पॉईंट मुंबई येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी माहिती दिली. तरे म्हणाले, “फसवणुकीने जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील ४७ हजार घुसखोर-अपात्रांचे आधारकार्ड प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत.”

किरीट सोमय्या यांनी माहिती दिली की, “जन्मतारीख बदलण्यासाठी अनेक व्यक्तींनी आधार प्राधिकरणाकडे अर्ज केला होता, आणि अशा संशयित लोकांची आधार कार्डे आता रद्द करण्यात आली आहेत.” त्यांनी असा आरोप केला की, या प्रकरणातील बहुतांश लोक हे बांगलादेशी किंवा रोहिंग्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कडे सोपवावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मानखुर्दमध्ये बनावट नोंदणी उघड: १०३ जणांचे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी

मानखुर्द (पूर्व) येथील महापालिका कार्यालयातून १०३ जणांनी फसवणूक करून जन्म प्रमाणपत्रे मिळवली असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात संबंधित १०३ जणांची प्रमाणपत्रे त्वरित रद्द करण्यात यावीत आणि त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांची स्पष्ट भूमिका आहे.

हे ही वाचा : 

“रस्त्यावर गायीचे शीर; अकबरी बेगम म्हणाल्या, ‘१०० रुपयांना गोमांसाची होम डिलिव्हरी मिळते’”

५० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्याला लखनौमधून ठोकल्या बेड्या

‘आय लव्ह मुहम्मद’ वादात माजी पोलीस झुबेर खान अटकेत, समाजवादी पक्षाशी संबंध उघड”

गृहपाठ न केल्यामुळे शाळकरी मुलाला उलटे लटकून मारहाण!

मालेगाव घोटाळा उघड: हजारो बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्रे रद्द, शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई

किरीट सोमय्या यांनी धक्कादायक माहिती देताना सांगितले की, मालेगाव महापालिकेने २०२४ साली बेकायदेशीररीत्या ३,९७७ लोकांना जन्म प्रमाणपत्रे जारी केली होती. ही सर्व प्रमाणपत्रे आता रद्द करण्यात आली असून, मालेगाव पोलिसांनी याप्रकरणी पाच गुन्हे दाखल केले आहेत.

ते पुढे म्हणाले की, न्यायालयाने नुकतेच ५३९ जणांना या प्रकरणात आरोपी घोषित केले असून, आणखी सुमारे १,५०० घुसखोर व अपात्र व्यक्तींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घोटाळ्यात सरकारी यंत्रणांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट होत असून, मालेगावमध्ये आतापर्यंत २८ शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, तसेच त्यातील अनेकांना अटकही करण्यात आली आहे. याशिवाय, ४३ वकिलांविरोधातही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

Exit mobile version