“ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न म्हणजे पाकिस्तानला ऑक्सिजन देण्यासारखे”

भाजपा खासदार गुलाम अली खटाणा यांची राहुल गांधींवरही टीका 

“ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न म्हणजे पाकिस्तानला ऑक्सिजन देण्यासारखे”

भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे राज्यसभा खासदार गुलाम अली खटाणा यांनी सांगितले की, “भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. या ऑपरेशनवर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास, ते पाकिस्तानला ऑक्सिजन देण्यासारखं आहे.”

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगावरील आरोपांवरही खटाणा यांनी टीका केली. ते म्हणाले, “ही केवळ त्यांची निराशा आहे. जनतेने त्यांना नाकारल्यानंतर अशी वक्तव्यं केली जातात, जेणेकरून चर्चेत राहता येईल. जिथे त्यांना विजय मिळतो, तिथे निवडणूक आयोग आणि ईव्हीएम योग्य वाटतात. पण त्यांना माहिती आहे की बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये जनता भाजपलाच मतदान करणार आहे.” दरम्यान, खासदार खटाणा यांच्या या प्रतिक्रियांनी राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, शनिवारी (९ ऑगस्ट) बेंगळुरू येथे एअर चीफ मार्शल एलएम कात्रे यांच्या व्याख्यानमाले दरम्यान, भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरशी संबंधित आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती सार्वजनिक केली होती.

हे ही वाचा : 

कोहली, एबी डिव्हिलियर्स, यश दयालसह अनेकांचा छत्तीसगढच्या युवकाला फोन!

वंदे भारत : मंत्री जितेंद्र सिंह यांनी जम्मूच्या नागरिकांना शुभेच्छा

रेल्वे नेटवर्कमध्ये ऑपरेशनल वंदे भारत ट्रेन्सची संख्या १४४ पर्यंत

ऑपरेशन सिंदूरने जगाला नव्या भारताचे दर्शन घडवले

७ मे ते १० मे दरम्यान चाललेल्या ऑपरेशनमध्ये, भारताच्या वायु दलाने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या (सरफेस टू एयर) क्षेपणास्त्र प्रणालीने पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक AEW&C (एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल) / ELINT विमान पाडले असल्याचे त्यांनी सांगितले. ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानला झालेल्या नुकसानाची माहिती भारताने पहिल्यांदाच जाहिर केली आहे.

Exit mobile version