१७ सप्टेंबर मोदींचा वाढदिवस; चलो जिते है अभियान, मोदींचा चित्रपट!

'रथ' सर्व २४३ विधानसभा मतदारसंघांना भेट देणार

१७ सप्टेंबर मोदींचा वाढदिवस; चलो जिते है अभियान, मोदींचा चित्रपट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे आणि  त्यांच्या वाढदिवसानिमित्त बिहारमध्ये ‘सेवा पंधरवडा’ सुरू करण्यात आला आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी सांगितले की, “पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवाडा म्हणून साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून आज (१६ सप्टेंबर) पाटण्यातील गांधी मैदानावरून “चलो जीते हैं” नावाच्या रथाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

हा रथ राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांना भेट देईल. प्रदेशाध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रथांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हे रथ राज्यातील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघांमध्ये जातील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रामुख्याने दाखवण्यात आलेला चित्रपट सुमारे ५० हजार ठिकाणी सार्वजनिकरित्या दाखवला जाईल.
प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल म्हणाले, ११ वर्षांत पंतप्रधान मोदींनी समाजाच्या तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्याचे काम केले आहे. आणि हा रथ प्रत्येक गावात जाऊन पंतप्रधान मोदींच्या कार्याचा संदेश पोहोचवण्याचे काम करेल.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी ‘या’ राज्याला मोठी भेट: ‘पीएम मित्र पार्क’चे उद्घाटन!

दरम्यान, या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे जनतेपर्यंत जाऊन सेवाकार्याला चालना देणे तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांबाबत जनजागृती करणे हा आहे. ‘चलों जीते हैं’ रथयात्रा पक्ष कार्यकर्ते आणि सामान्य जनतेमध्ये थेट संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम ठरेल. या माध्यमातून भाजप राज्याच्या कानाकोपऱ्यात आपली उपस्थिती अधिक ठोसपणे जाणवून देऊ इच्छित आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम एक महत्त्वाची तयारी मानली जात आहे.

Exit mobile version