बॉलिवूड सेलिब्रिटींनी केले भारतीय सैन्याचे कौतुक

बॉलिवूड सेलिब्रिटींनी केले भारतीय सैन्याचे कौतुक

भारत-पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती खूपच तणावपूर्ण आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानने केलेला ड्रोन हल्ला उधळून लावला. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने कठोर कारवाई करत पाकिस्तानच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर मोठा हल्ला केला.

रात्रभर सीमावर्ती भागात अस्वस्थ शांतता आणि सतर्कता होती. या गंभीर परिस्थितीत बॉलिवूड सेलिब्रिटीही अस्वस्थ आहेत. अनेक सेलिब्रिटींनी रात्रभर सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि भारतीय सैन्याच्या धाडसाला आणि तयारीला सलाम केला.

लष्कराच्या जवानांच्या शौर्याबद्दल अभिमान व्यक्त करत त्यांनी देशवासीयांना संयम आणि एकता राखण्याचे आवाहन केले.

देशाच्या खऱ्या नायकांना सलाम: रितेश

अभिनेता रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली, “आपल्या देशाच्या खऱ्या नायकांना माझा सलाम. आपले सैनिक निर्भयपणे आणि शौर्याने शत्रूंचा सामना करून आपल्याला सुरक्षा प्रदान करत आहेत. भारतीय सेना अमर रहे.” याशिवाय, रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलियानेही भारतीय सैन्याच्या अभिमानाचा उत्सव साजरा करणारी एक पोस्ट लिहिली आहे. जेनेलिया लिहिते, “भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला आणि बुद्धिमत्तेला सलाम. आम्ही तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी प्रार्थना करतो.”

 

अनिल कपूर यांनी शूरांना सलाम केला

अनिल कपूर यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केला. “आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या भारतीय सैन्यातील सर्व शूर आणि धाडसी सैनिकांचे मी आभार मानतो.” कंगना राणौतनेही हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला आणि भारतीय सैन्याला सलाम केला.

 

आमचे रक्षण केल्याबद्दल धन्यवाद: मानुषी

मानुषी छिल्लरने सोशल मीडियावर पोस्ट केले, “३ दशके संरक्षण मंत्रालयात काम करणाऱ्या डॉक्टरची मुलगी आणि एका लष्करी अधिकाऱ्याची भाची म्हणून, देशाची सेवा करण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी दिलेल्या बलिदानाबद्दल मला खूप आदर आणि कौतुक आहे. नेहमीच आमचे रक्षण केल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.”

 

Exit mobile version