एसएफजेने म्हटले आहे की ते भारतीय वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल. संघटनेने आपल्या निवेदनात माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी १८ सप्टेंबर २०२३ रोजी संसदेत दिलेल्या विधानाचा हवाला दिला आहे, ज्यामध्ये त्यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली होती.
खरे तर, ब्रिटिश कोलंबियातील गुरु नानक शीख गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये अज्ञातांनी निज्जरची गोळ्या घालून हत्या केली होती. भारताने तेव्हापासून ट्रूडोचे आरोप फेटाळून लावले आहेत आणि कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तथापि, एसएफजे म्हणते की ‘दोन वर्षांनंतरही भारतीय वाणिज्य दूतावास खालिस्तान रेफरेंडम समर्थकांवर लक्ष ठेवण्याचं आणि गुप्तहेरांचं जाळं (जासूसी नेटवर्क) चालवण्याचं काम करत आहे.’
हे ही वाचा :
… म्हणून कर्कला मारले; आरोपी रॉबिन्सनने पार्टनरला काय सांगितले?
“५० वर्षे देशसेवा, २७ आंतरराष्ट्रीय पुरस्कार”
“राजकारणात मोदींची एन्ट्री: एक प्रेरणादायक प्रवास”
समर्पणाचे प्रतीक असलेल्या पंतप्रधानांना शुभेच्छा! काय म्हणाले देशभरातील नेते?
दरम्यान, एसएफजेचे नेतृत्व गुरपतवंत सिंग पन्नून करत आहे, ज्याच्यावर भारतात आधीच बंदी घालण्यात आली आहे. भारताने कॅनडाच्या भूमीतून खलिस्तानी अतिरेकी भारतविरोधी कारवायांना चालना देत असल्याचा मुद्दा बराच काळ उपस्थित केला आहे, परंतु कॅनडाच्या सरकारने आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
