27.9 C
Mumbai
Saturday, July 4, 2026
घरविशेषसमर्पणाचे प्रतीक असलेल्या पंतप्रधानांना शुभेच्छा! काय म्हणाले देशभरातील नेते?

समर्पणाचे प्रतीक असलेल्या पंतप्रधानांना शुभेच्छा! काय म्हणाले देशभरातील नेते?

७५ व्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ वा वाढदिवस असून त्यांना जगभरातील नेत्यांसह देशभरातून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत नरेंद्र मोदी यांना त्याग आणि समर्पणाचे प्रतीक म्हटले आहे.

एक्सवरील पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, त्याग, समर्पणाचे प्रतीक आणि कोट्यवधी देशवासियांसाठी प्रेरणा असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सामाजिक जीवनात पाच दशकांहून अधिक काळ देशवासियांच्या कल्याणासाठी न थांबता किंवा न थकता अथक परिश्रम करणारे मोदी हे प्रत्येक नागरिकासाठी ‘नेशन फर्स्ट’ ची प्रेरणा आहेत, असे शाह यांनी लिहिले आहे.

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या प्रसंगी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या असाधारण नेतृत्वाद्वारे देशात महान ध्येये साध्य करण्याची संस्कृती रुजवली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या असाधारण नेतृत्वाद्वारे कठोर परिश्रमाचे शिखर दाखवून, तुम्ही देशात महान ध्येये साध्य करण्याची संस्कृती रुजवली आहे, असे राष्ट्रपतींनी पोस्ट केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रविकासाची नवी परिभाषा मांडणारे, आत्मनिर्भर भारताचे खंबीर नेतृत्व, द-बॉस, विश्वगुरू, आमचे नेते आणि प्रेरणास्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखंड महाराष्ट्रातर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!”

हे ही वाचा : 

अमेरिकेला दोहा हल्ल्याबद्दल आधीच माहिती होती! काय सांगतोय अहवाल?

नरेंद्र मोदींना शुभेच्छा देण्यासाठी ट्रम्प यांचा कॉल; रशिया युक्रेन युद्धावर काय केले भाष्य?

भारत सरकारवर टीका करत शाहिद आफ्रिदी राहुल गांधींवर उधळतोय स्तुतिसुमने

पाकला पराभव झेपेना; टीव्हीवर सूर्यकुमार यादवबद्दल अश्लील भाषेत टीका

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “नेतृत्व, कर्तुत्व, परिश्रम, कूटनीती, देशभक्ती याचे मापदंड बनलेले जागतिक कीर्तीचे नेते, भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी मंगलमय कामना,” अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
319,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा