32 C
Mumbai
Sunday, November 22, 2026
घरस्पोर्ट्सश्री समर्थ, विद्यार्थी, सरस्वतीची आगेकूच

श्री समर्थ, विद्यार्थी, सरस्वतीची आगेकूच

मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी खोखो स्पर्धा

Google News Follow

मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने, प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आयोजित आणि अथेना ग्लोबल लॉजिस्टिक पुरस्कृत पुरुष-महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत पुरुषांच्या लढतींमध्ये चांगलीच रंगत पाहायला मिळाली. महिलांमध्ये सरस्वती कन्या आणि श्री समर्थ व्यायाम मंदिराने, तर पुरुषांमध्ये विद्यार्थी क्रीडा केंद्र आणि श्री समर्थ व्यायाम मंदिराने प्रतिस्पर्ध्यांना नमवत विजेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. विद्यार्थी क्रीडा केंद्राने सात गुणांच्या फरकाने निर्विवाद विजय मिळवला, तर श्री समर्थने सरस्वती स्पोर्ट्स क्लबला अवघ्या एका गुणाने नमवत शेवटपर्यंत रंगलेल्या थरारात बाजी मारली. ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराच्या मैदानावर वेगवान आक्रमणे, भक्कम संरक्षण आणि प्रत्येक गुणासाठी झुंज देणाऱ्या खेळाडूंमुळे स्पर्धेचा रोमांच शिगेला पोहोचला.

जान्हवीचा अष्टपैलू खेळ

महिलांच्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात सरस्वती कन्या संघाने शिवनेरी सेवा मंडळाचा ९-६ (मध्यंतर ५-३) असा तीन गुणांनी पराभव करत विजयी आगेकूच केली. सरस्वतीच्या जान्हवी लोंढेने ३.४० व ४.४० मिनिटे संरक्षण करत तब्बल पाच गुणांची कमाई केली. तिच्या दमदार अष्टपैलू कामगिरीने संघाच्या विजयाचा पाया भक्कम केला. सेजल यादवने २ व ३ मिनिटे संरक्षण, तर खुशबू सुतारने २.५० मिनिटे संरक्षण आणि दोन गुण मिळवत विजयात मोलाचा वाटा उचलला. शिवनेरीकडून सिद्धी शिंदेने २.५० व २ मिनिटे संरक्षण आणि एक गुण, आरुषी गुप्ताने २.३० व २.१० मिनिटे संरक्षण, तर मुस्कान शेखने १.१० व ३ मिनिटे संरक्षणासह एक गुण मिळवत कडवी झुंज दिली. मात्र सरस्वतीच्या आक्रमक खेळापुढे शिवनेरीला विजयापर्यंत मजल मारता आली नाही.

श्री समर्थचा पलटवार

महिलांच्या दुसऱ्या साखळी सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने ओम साईश्वर सेवा मंडळाचा ११-८ असा तीन गुणांनी पराभव केला. मध्यंतराला ३-४ अशी एका गुणाची पिछाडी असलेल्या श्री समर्थने उत्तरार्धात जोरदार पुनरागमन करत विजयावर शिक्कामोर्तब केले. श्री समर्थच्या तन्वी मोरे, खुशी यादव, श्रिया नाईकने तर आस्था महाडिकने विजयश्री खेचून आणली. ओम साईश्वरच्या वैष्णवी परब, कादंबरी तेरवणकरने तर आर्या आचरेकरने दोन गुण मिळवत जोरदार प्रतिकार केला.

हे ही वाचा:

‘रामायण पार्ट १’ वर बंदी घालण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी

टाटाच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हरच्या डिझाईनची नक्कल

साताऱ्यात अदानी समूहाच्या प्रकल्पाचे काम रोखले

इंदिरा गांधींच्या सरकारने पक्ष कार्यकर्त्यांना न्यायाधीश नेमले

पुरुषांच्या साखळीतील पहिल्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा ९-८ असा अवघ्या एका गुणाने पराभव करत चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. मध्यंतराला ६-४ अशी आघाडी घेणाऱ्या श्री समर्थने प्रतिस्पर्ध्याच्या जोरदार आव्हानाला सामोरे जात विजय कायम राखला. सामन्यात ४.३० मिनिटे शिल्लक असताना श्री समर्थने बाजी मारली. श्री समर्थच्या वेदांत देसाईने २ व १.५० मिनिटे संरक्षण आणि एक गुण, सुरज खाकेने दोन मिनिटे संरक्षण व एक गुण, तर अक्षय खापरेने १.५० व एक मिनिट संरक्षणासह एक गुण मिळवत विजयात मोलाचे योगदान दिले.

पुरुषांच्या दुसऱ्या साखळी सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरचा १६-९ असा सात गुणांनी पराभव करत दणदणीत विजय नोंदवला. मध्यंतराला ६-५ अशी एका गुणाची आघाडी असलेल्या विद्यार्थ्यांनी उत्तरार्धात आक्रमणाचा वेग वाढवत प्रतिस्पर्ध्याला निष्प्रभ केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा