32 C
Mumbai
Sunday, November 22, 2026
घरविशेषकोटा अपघातावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

कोटा अपघातावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाखांची मदत

Google News Follow

गुजरात आणि राजस्थानमध्ये झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातांमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन्ही दुर्घटनांमध्ये एकूण १६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) देण्यात येणार आहे. याशिवाय अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने एका कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये लष्करी जवानांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश असून तीन लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करत जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे.
हे ही वाचा:
‘रामायण पार्ट १’ वर बंदी घालण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी

लग्नाचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक करणाऱ्याला दुबईतून आणले भारतात

टाटाच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हरच्या डिझाईनची नक्कल

कोयनेचे समुद्रात जाणारे ६७ टीएमसी पाणी मुंबईच्या वाटेला!

दुसरीकडे, राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातही भीषण अपघात झाला. कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा परिसरात भाविकांना घेऊन जाणारी क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. संबंधित कुटुंब खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन परतत असताना मध्यरात्री हा अपघात झाला. एकाच कुटुंबातील सदस्यांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दोन्ही दुर्घटनांनंतर केंद्र सरकारने मदतीची घोषणा केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध नेत्यांनीही या दुर्घटनांबद्दल शोक व्यक्त केला आहे. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रशासनाकडून पुढील कार्यवाही केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा