32 C
Mumbai
Sunday, November 22, 2026
घरस्पोर्ट्सजमशेद आलमने चार चेंडूंवर घेतले चार बळी

जमशेद आलमने चार चेंडूंवर घेतले चार बळी

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील पराक्रम

Google News Follow

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रेल्वेकडून खेळणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मध्यमगती वेगवान गोलंदाज जमशेद आलमने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या जमशेदने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रेल्वे संघाला सौराष्ट्रविरुद्ध विजय मिळवून दिला.

पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या जमशेद आलमने सौराष्ट्रच्या डावातील चौथे षटक आणि आपले पहिले षटक टाकताना सलग चार चेंडूंवर चार फलंदाजांना बाद केले. त्यानंतर पुढील षटकात आणखी एक विकेट घेत त्याने पाच बळींची कामगिरी पूर्ण केली. सलग चार चेंडूंवर चार विकेट घेणारा जमशेद हा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

विशेष म्हणजे, केवळ नऊ चेंडूंमध्ये जमशेदने पाच विकेट मिळवल्या. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये पाच विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज ठरला आहे. पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात पाच विकेट घेणारा जमशेद हा भारताचा सहावा गोलंदाज बनला आहे. या सामन्यात त्याने ३८ धावा देत पाच विकेट घेतल्या.

हे ही वाचा:

साताऱ्यात अदानी समूहाच्या प्रकल्पाचे काम रोखले

लाहोर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर!

माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिलात म्हणून सोन्याचे भाव घसरले!

कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे ७०० धावांचे पंचक

जमशेदने आपल्या पहिल्याच षटकात हार्विक देसाई, प्रेरक मांकड, रुचित अहीर आणि समर गज्जर यांना बाद केले. त्यानंतर पुढील षटकात सिद्धार्थ राणा याची विकेट घेत त्याने आपली पाच बळींची कामगिरी पूर्ण केली. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे एका टप्प्यावर सौराष्ट्रची अवस्था ६ बाद ३० अशी झाली होती.

जमशेदपूर्वी भारताच्या केवळ दोन गोलंदाजांनी टी-२० क्रिकेटमध्ये सलग चार चेंडूंवर चार विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुनने नोव्हेंबर २०१९ मध्ये हरियाणाविरुद्ध डावाच्या २० व्या षटकात चार विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर विदर्भाच्या दर्शन नळकांडेने नोव्हेंबर २०२१ मध्ये कर्नाटकविरुद्ध ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे, या दोन्ही गोलंदाजांनी डावाच्या २० व्या षटकात हा विक्रम केला होता.

रेल्वेचा २९ धावांनी विजय

या सामन्यात रेल्वेने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट्सच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सौराष्ट्रच्या संघाला आठ विकेट्स गमावत केवळ १५३ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे रेल्वेने हा सामना २९ धावांनी जिंकला. जमशेद आलमच्या पदार्पणातील या ऐतिहासिक गोलंदाजीमुळे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याची कामगिरी चर्चेचा विषय ठरली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा