नाले सफाई आणि अंतर्गत रस्त्यांची कामे पावसाळ्याआधी पूर्ण करा!

आमदार अतुल भातखळकर यांचे महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश 

नाले सफाई आणि अंतर्गत रस्त्यांची कामे पावसाळ्याआधी पूर्ण करा!

कांदिवली पूर्व हनुमान नगर येथील पठाण चाळ येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (STP) कामाकरता पोईसर नदीच्या प्रवाहात घातलेला भराव तसेच पोईसर येथील रेल्वे ब्रिजच्या कामाकरिता रेल्वेने घातलेला भराव १५ मे पूर्वी दूर करा अन्यथा एसटीपीचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर व रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाही केली जाईल असा इशारा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी कामांच्या पाहणी करताना दिला.

कांदिवली पूर्व विधानसभेतील नाले सफाई आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामांची पाहणी कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज (२ मे) केली. या कामांवर लक्ष्य ठेवण्या करता महानगपालिकेने निर्माण केलेल्या यंत्रणेला माहिती दिली जात आहे का? तसेच नाले सफाईची माहिती अप वर उपलोड केली जात आहे का? असे विविध प्रश्न आमदार अतुल भातखळकर यांनी अधिकाऱ्यांना विचारले.

हे ही वाचा : 

“भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास बांगलादेशने ईशान्येकडील राज्ये ताब्यात घ्यावीत”

बोरिवलीचा काजूपाडा परिसर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी दणाणला

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना आले कोर्टाचे बोलावणे!

एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ शो अखेर उल्लू ॲपने घेतला मागे!

यावेळी हनुमान नगर येथील पठाण चाळ एस. आर. ए. पासून ते पाल स्कूल, प्रमोद नवलकर गार्डन, अटळ बिहारी वाजपेयी समज केंद्र पर्यंत त्याच बरोबर पोईसर येथील बाकीच्या सर्व ठिकाणच्या नालेसफाई कामांची पाहणी करण्यात आली. या कामांवर कायम लक्ष्य ठेऊन १५ मे च्या आधी सर्व कामं पूर्ण करा असे निर्देश देखील आमदार भातखळकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

त्याच बरोबर हनुमान नगर व पोईसार येथील अंतर्गत रस्त्यांचे सीसी पॅसेजची कामं सुद्धा १५ मे च्या आधीच पूर्ण करा अशा सूचना देखील भातखळकर यांनी पाहणी दरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या व १५ मे नंतर मी पुन्हा पाहणीसाठी येईन, ह्या कामात कोणी गडबड केली तर त्यांच्यावर कठोर कारवाही केली जाईल, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

Exit mobile version