भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात बांगलादेशींना अटक!

पोलिसांकडून पुढील कारवाई सुरु 

भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात बांगलादेशींना अटक!

देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांविरोधात दिल्ली पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी व्हिसाचा कालावधी संपल्यामुळे सात बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. सध्या त्यांना परत पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे.

अटक करण्यात आलेले बांगलादेशी स्थलांतरित गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. मोहम्मद बेलाल (४७), मोहम्मद यासीन (२३), इमोन हुसेन (२१), मोहम्मद घियास उद्दीन (२८), मोहम्मद रुबेल हुसैन (२८), नसरुद्दीन (२७) आणि तनवीर हसन (३० ) अशी बांगलादेशींची नावे आहेत.

भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांची ओळख पटवण्यासाठी दिल्ली पोलिस डेटाबेस तयार करत आहेत आणि पडताळणी करत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली पोलिसांनी भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना हद्दपार केले होते.दिल्लीतील पहाडगंज भागातील एका हॉटेलमध्ये हे सात बांगलादेशी नागरिक थांबले होते आणि ते दुसऱ्या देशात पळून जाण्याच्या बेतात होते.

हे ही वाचा : 

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसली भारताची लष्करी ताकद, युद्ध रणगाडे, विमानांच्या आवाजाने पृथ्वी-आकाश हादरले!

पॅलेस्टिनींना शांततेत राहण्यासाठी इतरत्र घरे बांधावीत

उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता २७ जानेवारीला लागू होणार

ठाकरेंच्या स्वबळावर पवारांची बत्ती !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी व्हिसाची मुदत संपवली होती. पोलिसांनी त्यांना प्रथम परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयासमोर (एफआरआरओ) हजर करण्यात आले आणि नंतर त्यांना अटक केंद्रात पाठवले गेले जेथून त्यांना त्यांच्या देशात पाठवले जाईल. अटक करण्यात आलेल्या सात बांगलादेशी नागरिकांपैकी एकाकडून बनावट भारतीय जन्म प्रमाणपत्र जप्त आढळले. या प्रकरणी पोलिसांनी कमला मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपायुक्त एम हर्ष वर्धन यांच्या म्हणण्यानुसार, या आठवड्यात सात बांगलादेशी नागरिकांना हद्दपारीसाठी पाठवण्यात आले असून, यावर्षी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या अवैध परदेशी नागरिकांची संख्या १७ झाली आहे. पोलिसांनी तयार केलेल्या डेटाबेसमुळे अशा परदेशी नागरिकांचा माग काढण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version