‘सरदारजी ३’ वाद: दिलजीत दोसांझच्या समर्थनार्थ भाजपा नेते मैदानात!

नागरिकत्व रद्द करण्याची मागणी 'अन्याय्य आणि अपमानास्पद'

‘सरदारजी ३’ वाद: दिलजीत दोसांझच्या समर्थनार्थ भाजपा नेते मैदानात!

पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझच्या ‘सरदारजी ३’ चित्रपटावरील वाद आता राजकीय वळण घेत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचा चित्रपटात समावेश केल्यामुळे दिलजीतवर देशविरोधी भावनांना प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दोसांझचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी आता दिलजीत दोसांझच्या समर्थनार्थ भाजपा नेते मैदानात उतरले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आर.पी. सिंह यांनी ट्विटरवरील एका निवेदनात दिलजीत दोसांझचे समर्थन केले आणि म्हटले की, “तो केवळ एक लोकप्रिय कलाकार नाही तर भारतीय संस्कृतीचा आणि राष्ट्रीय संपत्तीचा जागतिक राजदूत आहे. FWICE च्या मागण्या धक्कादायक आणि अप्रमाणित आहेत.” त्यांनी असेही स्पष्ट केले की हा चित्रपट दहशतवादी हल्ल्यापूर्वी चित्रित करण्यात आला होता, ज्यामुळे वाद निर्माण झाला.

आरपी सिंग यांनी प्रश्न उपस्थित केला की, “जर टीव्ही चॅनेल पाकिस्तानी पाहुण्यांना आमंत्रित करतात आणि भारत-पाक क्रिकेट सामने आयोजित करतात, तर त्या प्रसंगांवरही टीका होते का?” त्यांनी FWICE ला त्यांच्या मागणीवर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आणि म्हटले की भारतीय प्रतिभेला लक्ष्य करण्यासाठी देशभक्तीचा वापर शस्त्र म्हणून करू नये.

Exit mobile version