मुख्यमंत्री म्हणून प्रशासनाची धुरा सांभाळताना कठोर निर्णय घेणारे देवेंद्र फडणवीस यांची एक वेगळी, संवेदनशील बाजू नागपुरातील एका भावनिक प्रसंगातून समोर आली. कोरोना काळात पती गमावलेल्या प्रीती यांच्या पुनर्विवाहात देवेंद्र फडणवीस यांनी भावाची भूमिका निभावत तिच्या नव्या संसाराची गाठ स्वतः बांधली. काही वर्षांपूर्वी वैधव्याचं दुःख सोसणाऱ्या प्रीती यांच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात होत असताना देवेंद्र फडणवीस तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
कोरोना महामारीच्या काळात नागपुरात १९ ते २५ वयोगटातील जवळपास २९३ तरुणींनी आपले पती गमावले, अशी माहिती समोर आली होती. अल्पवयातच वैधव्याचं दुःख वाट्याला आलेल्या या महिलांसमोर पुढील आयुष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. या परिस्थितीत तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी आमदार संदीप जोशी यांनी या कुटुंबांना आधार देण्याचा निर्णय घेतला. फडणवीस यांनी १०० कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले, तर संदीप जोशी यांनी इतर कुटुंबांची जबाबदारी घेतली. या कुटुंबांच्या शिक्षणापासून त्यांच्या दैनंदिन गरजा आणि भविष्यासाठी आवश्यक मदतीपर्यंतची जबाबदारी घेण्यात आली. यात प्रीती यांचा ही या कुटुंबांमध्ये समावेश होता. पतीच्या निधनानंतर आयुष्य थांबल्यासारखं वाटत असतानाच तिला नव्याने उभं राहण्यासाठी आधार मिळाला. कालांतराने तिच्या आयुष्यात पुन्हा लग्नाचा निर्णय झाला.
हे ही वाचा:
पोलिसांच्या बळासह आंदोलनातील हिंसाचाराची होणार चौकशी
हिंद-प्रशांतमध्ये भारत-जपानचा नवा ‘डिफेन्स फॉर्म्युला’
१९८४ शीख दंगलीतील दोषी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचे निधन
शहजाद भट्टी नेटवर्कवर प्रहार; ५२ आरोपी गजाआड
प्रीती यांच्या च्या विवाहसोहळ्यातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः तिच्या पदराची गाठ शिवम यांच्यासोबत बांधली आणि तिचा हात त्यांच्या हातात दिला. मंगलाष्टक सुरू असताना प्रीती यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. प्रीती यांनी विवाहानंतर आपल्या भावना व्यक्त करताना फडणवीस आणि संदीप जोशी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या दोघांनी कठीण काळात आधार दिल्यामुळेच आज नव्या आयुष्याची सुरुवात करता आली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
