मालवणी परिसराच्या पुनर्विकासासाठी ‘क्लस्टर मॉडेल’ विकसित करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मालवणी परिसराच्या पुनर्विकासासाठी ‘क्लस्टर मॉडेल’ विकसित करा

मालवणी परिसरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करताना ‘क्लस्टर मॉडेल’ विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच या परिसरातील अंबुजवाडी, दादासाहेब गायकवाड नगर व राजीव गांधी नगर येथील झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार असलम शेख उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मालवणी परिसरातील झोपड्यांचे राहिलेले सर्वेक्षण पूर्ण करावे. म्हाडा व झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्याकडे असलेल्या क्षेत्रानुसार सर्वे करावा. मालवणी परिसरातील संपूर्ण झोपड्यांचा सर्वे पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणांनी एकत्रित अहवाल सादर करावा. कायदेशीर अडचणी असलेल्या क्षेत्रांविषयी स्वतंत्रपणे कार्यवाही करावी. ज्या ठिकाणी विकासाची कामे प्रस्तावित आहेत, ती क्षेत्रे पुनर्विकासासाठी प्राधान्याने घ्यावीत.

हेही वाचा..

सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण

दिव्यांग – अव्यंग विवाह योजनेच्या अनुदानात वाढ

‘ऑपरेशन सिंदूर’ पुस्तकाचे वाशीत प्रकाशन

भाजपाने मणिपूरच्या आमदारांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली

‘क्लस्टर मॉडेल’द्वारे विकास केल्यास संपूर्ण मालवणी परिसराचा कमी कालावधीत पुनर्विकास शक्य होईल. हा झोपडपट्टी पुनर्विकासाचा मोठा प्रकल्प असून, त्यास गतीने पूर्णत्वास न्यावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बैठकीस अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) असीम कुमार गुप्ता, गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी सहभागी झाले होते. बैठकीत सादरीकरण म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले.

मालवणी पुनर्विकास योजना : थोडक्यात
मालवणी परिसरातील जमिनीचे एकूण क्षेत्रफळ ६४१ एकर आहे. यामध्ये राज्य शासन, म्हाडा, महापालिका आणि खासगी जमिनीचा समावेश आहे. त्यापैकी ५६५.९८ एकर क्षेत्रावर झोपडपट्टी आहे, तर ७५.०२ एकर क्षेत्र खुले आहे. या परिसरातील अंदाजे झोपड्यांची संख्या १४ हजार इतकी आहे. परिसराच्या पुनर्विकासानंतर हे संपूर्ण क्षेत्र झोपडपट्टीमुक्त होणार आहे.

Exit mobile version