स्पुटनिकच्या तिसऱ्या चाचणीला मंजुरी

स्पुटनिकच्या तिसऱ्या चाचणीला मंजुरी

स्पुटनिक लाईट सिंगल डोस लस लवकरच देशात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने बुधवारी भारतात स्पुटनिक लाइट लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी परवानगी दिली आहे. स्पुटनिक लाइट ही सिंगल डोस कोविड-१९ लस रशियामध्ये बनली आहे. मेडिकल जर्नल द लॅन्सेटमध्ये असे म्हटले होते की कोविड-१९ विरूद्ध स्पुटनिक लाईटची ही लस ७८.६ ते ८३.७ टक्के प्रभावी आहे. जे की दोन डोस लसींपेक्षा जास्त आहे.

जुलैमध्ये, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या  सबजेक्ट एक्पर्ट कमिटीने स्पुटनिकचा इमर्जन्सी वापर करण्यास परवानगी नाकारली आणि देशात रशियन लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या घेण्याची गरज असल्याचे सांगितले. कमिटीने नमूद केले की स्पुटनिक- व्हीमध्ये स्पुटनिक लाइटमध्ये समान घटक वापरले जातात आणि चाचणी दरम्यान भारतीय लोकसंख्येवरील सुरक्षा आणि प्रतिकारशक्ती बाबतचा डेटा समोर आला आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे टेलिकॉम कंपन्यांवरील संकट दूर होणार

ठाकरे सरकारने ओबीसींचा घात केला

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयाने लव्ह जिहादला बसणार फटका

कोरोनाची जन्मभूमी चीनमध्येच पुन्हा कोरोनाचे थैमान

अर्जेंटिनामध्ये, सुमारे ४० हजार नागरिकांचा स्टडी केला गेला. या स्टडीनुसार, स्पुतनिक लाईट लस रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता ८२.१-८७.६ टक्क्यांनी कमी करते. विशेष म्हणजे, रशियन डायरेक्टर्स इन्व्हेस्टमेंट फंडने गेल्या वर्षी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजसोबत भारतात स्पुटनिक-व्हीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी करार केला होता. एप्रिलमध्ये, स्पुतनिक- व्हीला भारतात इमर्जन्सी वापराची परवानगी देण्यात आली. १४ मे रोजी डॉ. रेड्डी यांनी हैदराबादमध्ये मर्यादित स्वरुपात पहिली लस दिली होती.

Exit mobile version