अभिनेता दिलजीत दोसांझचा आगामी चित्रपट ‘सरदार जी ३’ हा २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. रविवारी (२२ जून) अभिनेता दिलजीतने सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. या चित्रपटात अभिनेता दिलजीतसह पाक अभिनेत्री हानिया आमिर देखील सोबत आहे.
मात्र, हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाहीये. भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. पहलगाम हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर नंतर चित्रपट उद्योगाने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यामुळे हा चित्रपट देशात प्रदर्शित होणार नाही. दिलजीतने सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. इंस्टाग्राम पेजवर ट्रेलर शेअर करताना दिलजीतने लिहिले, “सरदार जी ३’, २७ जून रोजी परदेशात प्रदर्शित होत आहे.”
दरम्यान, ‘सरदार जी ३’ चा ट्रेलर भारतातील प्रेक्षकांसाठी यूट्यूबवर देखील उपलब्ध नाही. जेव्हा व्हिडिओ प्ले करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तो प्ले होत नाही आणि तो भारतात दाखवला जाणार नाही असा संदेश येतो. तथापि, टीझर आणि गाणी भारतात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. ‘सरदार जी ३’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे ज्यामध्ये दिलजीत दोसांझ, हानिया आमिर आणि नीरू बाजवा आहेत.
हे ही वाचा :
आंध्रमध्ये पक्षाच्या समर्थकाला ताफ्याच्या गाडीखाली चिरडल्यानंतर जगन रेड्डींविरुद्ध गुन्हा दाखल
शत्रूने मोठी चूक केली, त्याला शिक्षा झालीच पाहिजे!
पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींशी संवाद, व्यक्त केली चिंता
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांविरुद्ध “Boycott” ट्रेंड सुरु झाला आणि भारताने कारवाई करत पाक कलाकारांवर बंदी घालण्याच्या कारवाईला सुरुवात केली. पाकिस्तानी चित्रपट, गाणी देखील सोशल मिडियावरून हटवण्यात आली. यासह पाकिस्तानी नागरिकांचे सोशल मिडिया खाते देखील बंद करण्यात आले. दरम्यान, या सर्व कारणांमुळे ‘सरदार जी ३’ च्या चित्रपट निर्मात्यांना भारतात या चित्रपटावर बंदी घालावी लागली आहे. ‘सरदार जी ३’ च्या आधी, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली होती.
