दिव्या देशमुखने फिडे महिला विश्वचषकासह जिंकला ग्रँडमास्टरचा किताब

अनुभवी कोनेरू हम्पीवर मात करत ऐतिहासिक कामगिरी

दिव्या देशमुखने फिडे महिला विश्वचषकासह जिंकला ग्रँडमास्टरचा किताब

सोमवारी जॉर्जियातील बटुमी येथे पार पडलेल्या टाय-ब्रेकमधील दुसऱ्या रॅपिड बुद्धिबळ डावात अनुभवी कोनेरू हम्पीचा पराभव करत दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकला. या विजयासह दिव्याने ग्रँडमास्टरचा किताबही जिंकला आणि ती हा किताब जिंकणारी चौथी भारतीय महिला ठरली.

भारताच्या दिव्या देशमुखने महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सोमवारी आपल्या देशबांधव हम्पीविरुद्ध खेळताना विजयी ठसा उमटवला.

१९ वर्षांच्या दिव्या देशमुखने अंतिम फेरीपर्यंतच्या आपल्या विलक्षण प्रवासाला योग्य न्याय देत दुसऱ्या रॅपिड डावात काळ्या मोहऱ्यांच्या सहाय्याने विजय मिळवला. पहिला डाव बरोबरीत सुटला होता. दोन्ही क्लासिकल डाव अनिर्णीत झाल्याने सामना टाय-ब्रेकमध्ये गेला होता.

सोमवारी, पहिला रॅपिड टाय-ब्रेक डाव बरोबरीत सुटल्यानंतर, ३८ वर्षीय हम्पीकडून ५४ व्या चालीत झालेल्या एक चूक दिव्याने ओळखली आणि ती संधी तिने सोडली नाही. हम्पी सध्या जागतिक रॅपिड बुद्धिबळ विजेती असूनसुद्धा दिव्याने तिच्यावर मात केली.

या विजयामुळे दिव्या देशमुख भारतातील ग्रँडमास्टर किताब मिळवणारी चौथी महिला खेळाडू ठरली आहे. याआधी हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि आर. वैशाली या खेळाडूंनी हा मान मिळवला आहे. तसेच, अंतिम फेरी गाठल्यामुळे दिव्या आणि हम्पी दोघींनीही महिलांच्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या स्पर्धेचा विजेता चीनच्या सध्या विद्यमान महिला विश्वविजेती जू वेनजून हिच्या विरुद्ध अंतिम सामना खेळेल.

हे ही वाचा:

धर्मांतराच्या मास्टरमाइंड छांगूर बाबाचा पाय खोलात

गौरव गोगोई यांच्या विधानावर ललन सिंह यांचा पलटवार

मुंबई-म्हैसूर पोलिसांची संयुक्त कारवाई, म्हैसूरमध्ये १०० कोटींचे एमडीएमए जप्त

कृष्णा हेगडे यांचा भागवत यांच्या वक्तव्याला पाठिंबा

भारतीय महिला बुद्धिबळासाठी ऐतिहासिक क्षण

नागपूरच्या दिव्याने ही कामगिरी करताना देशाच्या युवा बुद्धिबळ खेळाडूंनी मिळवलेल्या यशात भर घातली आहे. याआधी १८ वर्षीय डी. गुकेशने सिंगापूरमध्ये फिडे जागतिक अजिंक्यपद जिंकले होते. हम्पीशी हस्तांदोलन करताना आणि विजयाची भावना व्यक्त करताना दिव्या भावुक झाली, आनंदाश्रू अनावर झाले. अंतिम चाल खेळल्यानंतर ती डोक्यावर हात ठेवून उभी राहिली आणि हम्पीने हातात हात दिल्यावर तिचे डोळे पाणावले. बाहेर येऊन तिने आपल्या आईला मिठी मारली.

“हे सगळं मला अजून समजून घ्यायला वेळ लागेल,” असं विजयानंतर काही मिनिटांनी दिलेल्या मुलाखतीत दिव्याने सांगितलं. “माझ्याकडे केवळ एकच नॉर्म होता, त्यामुळे ग्रँडमास्टर बनणं हे नशिबातच लिहिलं होतं.”

“हे यश खूप मोठं आहे, पण अजून खूप काही गाठायचं आहे. हे फक्त सुरुवात आहे,” असंही तिने स्पष्ट केलं.

दिव्याच्या पूर्वीच्या उल्लेखनीय कामगिरी:

भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने ‘एक्स’वर (माजी ट्विटर) पोस्ट करत दिव्या देशमुखचे या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले आणि कोनेरू हम्पीचाही खास उल्लेख केला.

त्यांनी लिहिले, “विश्वचषक जिंकल्याबद्दल दिव्या देशमुखचे अभिनंदन. ग्रँडमास्टर बनणे आणि कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता मिळवणे, तणावपूर्ण लढतीत कमालीचा विजय. कोनेरू हम्पीने अतिशय उत्तम खेळ केला आणि लढण्याची इच्छाशक्ती दाखवली. ती खरी चॅम्पियन आहे! हा भारतीय बुद्धिबळाचा, विशेषतः महिला बुद्धिबळाचा, एक भव्य उत्सव होता.

Exit mobile version