राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सबरीमाला मंदिराला देणार भेट!

श्री अय्यप्पा मंदिराला भेट देणाऱ्या ठरणार पहिल्या राष्ट्रपती 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सबरीमाला मंदिराला देणार भेट!

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १९ मे रोजी केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला श्री अय्यप्पा मंदिराला भेट देणार आहे. या पवित्र ठिकाणी भेट देणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या विद्यमान राष्ट्रपती असणार आहेत. मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने (टीडीबी) त्यांच्या भेटीची पुष्टी केली. राष्ट्रपती मुर्मू १८ मे पासून केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असणार आहेत.

त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे अध्यक्ष पीएस प्रशांत म्हणाले, “एखाद्या राष्ट्रपतीने शबरीमला मंदिराला भेट देण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. मंदिराला भेट देण्यासाठी त्या चालत वर जातील कि वाहने वर घेऊन जातील, हे राष्ट्रपतींचे एसपीजी कमांडो ठरवतील. आम्ही त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करू.”

ते पुढे म्हणाले,  १८ आणि १९ मे रोजी भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार नाही. यासाठी क्यूआर तिकीट सेवा देखील बंद करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमानुसार, राष्ट्रपती १८ मे रोजी कोट्टायम येथे पोहोचतील, जिथे त्या एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होतील. दुसऱ्या दिवशी, १९ मे रोजी त्या निलक्कल हेलिपॅडवर पोहोचतील, जिथून त्या सबरीमाला मंदिराकडे रवाना होतील.

हे ही वाचा : 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत होणार!

आवडले म्हणून बापन शेखने बायकोचे नाकच चावून गिळले

पहलगाम हल्ल्यासाठी सपा नेते पाकिस्तानला क्लीन चिट देतायेत!

सर्वोच्च न्यायालयाच्या ३३ पैकी २१ न्यायमूर्तींची संपत्ती जाहीर, किती आहे मालमत्ता?

ही भेट अनेक प्रकारे ऐतिहासिक आहे, कारण सबरीमाला मंदिर त्याच्या धार्मिक आणि सामाजिक परंपरांसाठी जगप्रसिद्ध आहे आणि देशाच्या राष्ट्रपतींची ही पहिलीच भेट असणार आहे. त्यांचे हे पाऊल केवळ आध्यात्मिक उपक्रम म्हणूनच नव्हे तर सांस्कृतिक संबंधांच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जात आहे.

Exit mobile version