एकनाथ शिंदे म्हणजे ‘एसंशि’ तर UT म्हणजे ‘युज ॲंड थ्रो’

उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

एकनाथ शिंदे म्हणजे ‘एसंशि’ तर UT म्हणजे ‘युज ॲंड थ्रो’

उबाठा गटाने वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केला. त्यामुळे त्यांचे बेगडी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार कायमचे सोडले हे शिक्कामोर्तब झाले आहे, उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. कालचा दिवस उबाठासाठी दुर्दैवी होता. ते म्हणतात वक्फ बील आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही, आमचे वक्फ बिलाला विरोध नाही तर भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे. ‘धरलं कि चावतंय आणि सोडलं कि पळतंय’, अशी त्यांची परिस्थिती झाली असल्याचा टोला उपमुख्यमंत्री शिंदेंनी लगावला.

ते म्हणाले, देशभक्त मुस्लिमांना बाळासाहेबांचा पाठींबा होता. त्याचप्रमाणे आमचा, भाजपाचा आणि पंतप्रधान मोदींचा पाठींबा आहे. परंतु, राहुल गांधींची सावली मिळाल्यामुळे उबाठाला जीन्हांची आठवण येत आहे. आजची त्यांची पत्रकार परिषद ही स्वतःची आबरू काढून घेण्यासारखे होती.

वक्फ सुधारणा विधेयकामुळे ज्यांच्या हातामध्ये लाखो-करोडो जमिनी आहेत त्यांना चाप बसणार आहे. त्यामुळे वक्फच्या मालमत्तेवर आता शाळा, कॉलेज, महिलांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळेल. मुस्लिम समुदायाने देखील याचे स्वागत केले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हे ही वाचा : 

केनियन नागरिक असलेल्या महिलेला अटक, २० कोटींचे कोकेन जप्त

एआय स्वीकारण्यात भारत दक्षिण आशियाचे नेतृत्व करणार

“पूल शॉटचा अंदाज चुकला, कोहलीचा खेळ संपला!

यूपीत माफियागिरी चालणार नाही

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ संभाजी शिंदे यांचा उल्लेख ‘एसंशि’ असा केला होता. यावर उत्तर देत उपमुख्यमंत्री शिंदेंनी सवाल उपस्थित केला की, मला एसंशि म्हणाले मग मी त्यांना युटी म्हणू का? युज ॲंड थ्रो?. वापरा आणि फेका ही त्यांची नीती आहे. आम्हाला खोके म्हणाले त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने खोक्यात बंद केले, असा टोला त्यांनी लगावला. उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, यांची घर का ना घाट का अशी परिस्थिती झाली आहे. काल जे त्यांनी केलं ते मोठा अपराध होता, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Exit mobile version