भूल न देता फुफ्फुसाची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरीची नोंद

भूल न देता फुफ्फुसाची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

देशातील वैद्यकीय क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली गेली आहे. सीपीआरमध्ये (CPR) भूल न देता फुफ्फुसाची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून, या शस्त्रक्रियेत देशात पहिल्यांदाच रुग्णाची श्वासनलिका (एअरवे/ट्रॅकिया) यशस्वीरीत्या जोडण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया रुग्णाला पूर्ण भूल न देता करण्यात आली. त्यामुळे श्वसनसंस्थेशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करताना भविष्यात नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अत्यंत सूक्ष्म नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सतत निरीक्षणाच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया पूर्ण केली.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, रुग्णाला भूल दिल्यास होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी ‘अवेक सर्जरी’ पद्धतीचा अवलंब करण्यात आला. यामुळे रुग्ण शस्त्रक्रियेदरम्यान शुद्धीत होता, मात्र वेदना नियंत्रणात ठेवण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. ही यशस्वी शस्त्रक्रिया म्हणजे फुफ्फुस व श्वसनसंस्थेच्या उपचारांमध्ये एक मोठी झेप मानली जात असून, भविष्यात अशा गुंतागुंतीच्या रुग्णांसाठी नवी आशा निर्माण झाली आहे.

सोहम माळवे हा तरुण दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने जात असताना किणी गावाजवळ डिव्हायडरला धडकल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत छातीवर जबर मार बसल्याने फुफ्फुसातील श्वासनलिका तुटल्याचे निष्पन्न झाले. श्वासनलिका तुटल्यामुळे त्याला भूल देणे किंवा व्हेंटिलेटरवर ठेवणे अशक्य बनले होते. त्यामुळे पुढील उपचार करणे कठीण झाल्याने त्याला मुंबई किंवा पुण्यात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.

हे ही वाचा..

तुर्कमन गेट दगडफेक प्रकरणी मोहम्मद इम्रानला अटक

‘लँड फॉर जॉब घोटाळा’ प्रकरणात लालू यादवांसह कुटुंबियांविरोधात आरोप निश्चित करा

“डॅनिश भूभागावर आक्रमण केले तर सैन्य थेट गोळीबार करेल!”

“करार झाला होता, पण पंतप्रधान मोदींनी फोन केला नाही”

मात्र, नातेवाइकांनी त्याला सीपीआर रुग्णालयाच्या हृदयशस्त्रक्रिया विभागात दाखल केले. येथे सिटी स्कॅनसह अन्य पूरक तपासण्या केल्यानंतर फुफ्फुसातील श्वासनलिका पूर्णपणे तुटल्याचे स्पष्ट झाले. यावेळी डॉ. किशोर देवरे यांनी फेमोरो बायपास तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाला ‘हार्ट-लंग मशीन’वर नेले. त्यामुळे श्वसन सुरक्षित ठेवणे शक्य झाले. यानंतर छाती उघडून तुटलेली श्वासनलिका व रक्तवाहिन्या पूर्ववत जोडण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

Exit mobile version