दिल्लीत इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू

ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेल्याची भीती

दिल्लीत इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू

नवी दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरात इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी पहाटे चार मजली इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ टीम आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे. रात्री झालेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात असून नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

दिल्लीतील मुस्तफाबाद भागात शनिवार, १९ एप्रिल रोजी पहाटे चार मजली इमारत कोसळली. यात चार जणांचा मृत्यू झाला. सुमारे २६ हून अधिक लोक मलब्यात गाडले गेले आहेत. त्यातील १८ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून ८- १० लोक अजूनही अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विभागीय अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल यांनी सांगितले की, इमारत कोसळल्याची माहिती पहाटे २:५० वाजता माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि पाहिले की संपूर्ण इमारत कोसळली होती. लोक ढिगाऱ्याखाली दाबले गेले होते. सध्या एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन सेवा बचावकार्याचे काम करत आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत ८ ते १० जणांना वाचवण्यात आले आहे.

तसेच इमारत कोसळल्याची माहिती मिळताच श्वान पथक, पोलिस आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली असलेल्या चार जणांचा मृत्यू झाला. बचाव कार्य अजूनही सुरू आहे.

हे ही वाचा : 

जम्मू आणि काश्मीरमध्ये सैनिकांकडून प्राध्यापकाला मारहाण?

नालासोपाऱ्यात घुसखोर बांगलादेशीला अटक, आतापर्यंत ९ जण ताब्यात!

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, युक्रेनमध्ये युद्धविराम शक्य!

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी संपूर्ण गावालाच चपला पाठविल्या, कारण काय?

शुक्रवारी दिल्लीतील हवामान अचानक बदलले. रात्री मुसळधार पाऊस आणि वादळ आले. त्यामुळे इमारत कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्लीतील मधु विहारमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत पडली होती. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले होते.

Exit mobile version