दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात भारताला 30 धावांनी पराभव पत्करावा लागला. 124 धावांच्या साध्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ फक्त 93 धावांत गडगडला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाचे मूल्यमापन सुरू झाले असून, माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी थेट कोच गौतम गंभीरला सल्ला दिला आहे.
गांगुली म्हणाले,
“भारताने पिचशी छेडछाड करणे थांबवावे. आपल्याकडे आधीच दर्जेदार गोलंदाज आहेत. चांगल्या, समतोल पिचवर खेळलं तर आपले फलंदाज 350+ धावा करू शकतील.”
ते पुढे म्हणाले,
“मला आशा आहे की गौतम गंभीर हे ऐकत असतील. टेस्ट सामने तीन दिवसांत नाही तर पाच दिवसांत निकालात यायला हवेत.”
गांगुली यांनी विशेष आग्रह केला की मोहम्मद शमीला पुन्हा टेस्ट टीममध्ये संधी देण्यात यावी.
ते म्हणाले,
“बुमराह, सिराज आणि शमी या तिघांवर विश्वास ठेवायला हवा. शमीला टेस्ट टीममध्ये जागा मिळायला हवी. तो आणि स्पिनर भारताला टेस्ट जिंकवू शकतात.”
शमी सध्या घरगुती क्रिकेट खेळत आहेत, परंतु फिटनेसच्या कारणामुळे त्यांची निवड झाली नाही. त्यांनी शेवटचे टेस्ट 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध WTC फायनलमध्ये खेळले होते. शमीकडे 64 टेस्टमध्ये 229 विकेट्सचा अनुभव आहे.
ईडन गार्डन्सच्या पिचवर निर्माण झालेल्या वादाबद्दल गांगुली म्हणाले,
“पिच तशीच होती जशी टीमला हवी होती.”
