हिंदी चित्रपटांनी मांडला फाळणीचा वेदनादायी इतिहास

हिंदी चित्रपटांनी मांडला फाळणीचा वेदनादायी इतिहास

१९४७ मधील तो दिवस, जेव्हा देशाच्या फाळणीच्या काळात द्वेष आणि हिंसेमुळे असंख्य लोक बेघर झाले आणि त्यांचीच आठवण म्हणून १४ ऑगस्ट हा ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ म्हणून साजरा केला जातो. या फाळणीत कित्येकांचे घर गेले, आप्तस्वकीय गमावले, हृदय तुटले आणि डोळ्यांपुढे कोरले गेलेले ते भयानक दृश्य आजही अंगावर काटा आणते. त्या काळातील यातना, संघर्ष आणि संवेदनशील मुद्द्यांना हात घालणारे अनेक चित्रपट बॉलिवूडने आपल्याला दिले आहेत. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा ‘पिंजर’ हा अमृता प्रीतम यांच्या कादंबरीवर आधारित असून, फाळणीच्या काळातील महिलांच्या वेदना दाखवतो. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात उर्मिला मातोंडकर हिने साकारलेल्या ‘पूरो’ या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. पूरो ही एक हिंदू मुलगी असते, जिचे अपहरण एक मुस्लिम युवक (मनोज बाजपेयी) करतो. हा चित्रपट सामाजिक बंधने, द्वेष आणि मानवतेतील गुंतागुंत स्पष्ट करतो. ‘पिंजर’ने फाळणीची शोकांतिका प्रभावीपणे मांडली असून, तिच्या वेदनांवर विचार करायला भाग पाडतो. चित्रपटातील प्रत्येक दृश्यात भावना ओसंडून वाहतात.

२००३ मध्येच प्रदर्शित झालेला सबीहा सुमर यांचा ‘खामोश पानी’ हा चित्रपट पाकिस्तानमधील एका गावाची कथा सांगतो, जिथे फाळणीच्या आठवणी एका स्त्री आणि तिच्या मुलाच्या आयुष्याशी गुंफलेल्या आहेत. किरण खेरच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट लक्षवेधी ठरतो. इंडो-पाकिस्तान निर्मित हा चित्रपट एका पंजाबी गावातील विधवा आई आणि तिच्या मुलाभोवती फिरतो. पाकिस्तानमधील एका गावात चित्रित झालेला हा चित्रपट भारतातही प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा..

निवृत्त न्यायाधीशाच्या घरावर दरोडा! 

छत्रपती संभाजीनगरमध्ये ६५९१ भोंगे पोलिसांनी हटवले!

सचिनचा सुपुत्र अर्जुन होणार आता जावई

युक्रेन युद्ध थांबवा, नाहीतर… पुतीन यांना कुणी दिली धमकी?

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर’ हा चित्रपट फाळणीच्या पार्श्वभूमीवर प्रेम आणि बलिदानाची कथा मांडतो. २००१ मध्ये आलेल्या या चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत आहेत. यात एका शीख ट्रक ड्रायव्हर तारा सिंग आणि मुस्लिम मुलगी सकीना यांची प्रेमकथा दाखवली आहे. फाळणीतील हिंसा आणि द्वेषाच्या वातावरणात तारा आपल्या पत्नी आणि मुलाला वाचवण्यासाठी पाकिस्तानात जातो. ‘गदर’ने फाळणीच्या वेदना संवेदनशीलतेने मांडल्या आहेत.

‘१९४७ : अर्थ’ हा इंडो-कॅनेडियन पीरियड रोमांस-ड्रामा चित्रपट आहे, जो १९९९ मध्ये प्रदर्शित झाला. दिग्दर्शन दीपा मेहता यांनी केले असून, हा बाप्सी सिधवा यांच्या ‘क्रॅकिंग इंडिया’ या कादंबरीवर आधारित आहे. ही कथा लाहोरमधील १९४७ च्या भारताच्या स्वातंत्र्याच्या आणि फाळणीच्या आधी-पश्चात काळाची आहे. पोलिओग्रस्त ‘लेनी’ ही एका श्रीमंत पारशी कुटुंबातील मुलगी आपली गोष्ट सांगते. तिचे आई-वडील बंटी आणि रुस्तम, तसेच आया शांता हिची काळजी घेतात. शांता चे प्रियकर दिल आणि हसन व त्यांचे वेगवेगळ्या धर्मांचे मित्र एकत्र वेळ घालवतात. पण फाळणीच्या जखमा त्यांच्या आयुष्यातही उमटतात. खुशवंत सिंह यांच्या कादंबरीवर आधारित पामेला रूक्स दिग्दर्शित ‘ट्रेन टू पाकिस्तान’ हा चित्रपट १९९८ मध्ये प्रदर्शित झाला. यात एका पंजाबी गावाची कथा आहे, जिथे शीख आणि मुस्लिम समुदाय शांततेत राहतात. पण फाळणीतील हिंसा गावालाही ग्रासते. लाशांनी भरलेली रेल्वे गावात पोहोचते तो दृश्य फाळणीची भीषणता तीव्रतेने दाखवते.

Exit mobile version