मंत्रालयात होणारे आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना!

मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर कलर कोड एंट्री पास

मंत्रालयात होणारे आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना!

मागील महिन्यात अमरावती येथील अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयामधील सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर बीडच्या आंबाजोगाई येथून आलेल्या तरुणाने शिक्षक भरती करावी या मागणीसाठी सुरक्षा जाळीवर उडी मारत आंदोलन केलं. यानंतर गृहविभाग अ‍ॅक्शन मोड आली असून मंत्रालयात येणाऱ्यांसाठी तसेच मंत्रालयामध्ये वारंवार होणारे आत्महत्येचे प्रयत्नावर आळा घालण्यासाठी गृहविभागाकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

वेब पोर्टल व मोबाईल ॲप / फ्लॅप बॅरिअर: मंत्रालय सुरक्षा भाग दोन यामध्ये वेब पोर्टल व मोबाईल ॲपद्वारे मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची नोंदणी केली जाणार आहे.यामध्ये अभ्यागतांची चाचणी,नोंदणी केलेला वेळ तसेच अभाग्यतांना ज्या विभागात जायचे आहे तेथील पास याबाबत कार्यवाही पोलीस उपायुक्त व मंत्रालय सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.अभाग्यतांना ज्या विभागात जायचे आहे तो विभाग सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये यासाठी फ्लॅप बॅरिअर बसवून प्रवेश प्रतिबंध करण्यात येणार आहे.तसेच आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या सोबत येणाऱ्या व्यक्तीकरिता पूर्वनियोजित टाइमिंग स्लॉट बुकिंग करणे व पास काढणे बंधनकारक असणार आहे.

अद्ययावत व्हिजीटर प्लाझा:मंत्रालयातील गार्डन गेट येथील मोकळ्या जागेत सुरक्षा तपासणी कक्ष (व्हिजीटर प्लाझा) उभारण्यात येणार आहे.यामध्ये पास काउंटर, अभ्यागतांसाठी वेटिंग रूम, त्यांच्या बॅगांसाठी लॉकर, स्कॅनर अशा गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.

हे ही वाचा:

नेमबाजीने दिली सर्वाधिक सुवर्णपदके

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा अमृतकाल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाच्या खंडाचे मंत्रालयात प्रकाशन!

२०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया शरद पवारांचीच

मंत्रालयातील अभ्यागतांना मर्यादित प्रवेश:मंत्रालयामध्ये प्रत्येक दिवशी अभ्यागतांची संख्या ३ हजाराच्या वर असते.मंत्रिमंडळाची बैठक असेल तर हि संख्या ५ हजारा पेक्षा जास्त असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.इमारतीमध्ये एकाच वेळी झाल्यास प्रशासकीय विभागाच्या दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम होतो.म्हणून मंत्रालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांची संख्या व वाहनांची संख्या मर्यादित करण्यात आल्या आहेत.

मंत्रालयामध्ये दर दिवशी किती अभ्यागतांना प्रवेश देण्यात यावा याबाबत मंत्रालय सुरक्षा पोलीस उपायुक्त हे निश्चित करतील व ती कार्यप्रणाली गृह विभागास सादर करतील.तसेच मंत्रालयाचे कामकाज संपल्यानंतर अभ्यागतांना मंत्रालय परिसरात थांबता येणार नाही.मंत्रालयातील उपहारगृहाची वेळ सायंकाळी ०७:०० वाजेपर्यंत वाढवण्यात येणार असून मंत्रालयाच्या परिसरात बाहेरून कोणत्याही स्वरूपाचे खाद्यपदार्थ (कर्मचाऱ्यांच्या जेवणाचे डबे वगळून ) आणण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.तसेच अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश करताना स्वतःजवळ १० हजार पेक्षा जास्त रक्कम घेऊन जाण्यास मनाई करण्यात येणार आहे.

ऑनलाईन प्रवेश पास: नजीकच्या कालावधीमध्ये अभ्यागतांना प्रवेश प्रक्रिया देण्याची ऑनलाईन कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे.ऑनलाईन प्रवेश पासबाबत NIC स्वागतम पोर्टलद्वारे आवश्यक ती कार्यवाही करण्यात करणार आहे.

वाहन पार्किंग/ प्रवेश/ निर्गमन: मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्र्यांची वाहने व त्यांच्या ताफ्यातील वाहनांना प्रवेश असणार आहे.मंत्र्यांच्या वाहनांसाठी निश्चित केलेल्या जागेवर पार्किंग करणे व मुख्य प्रवेशद्वाराने बाहेर जाण्यासाठी परवानगी असणार आहे, या व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनास मुख्यप्रवेशद्वारातुन प्रवेश अथवा बाहेर जाण्यास परवानगी असणार नाही.मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यासाठी इतर खाजगी वाहनांना मात्र प्रवेश, पार्किंग पास काढणे बंधन कारक असणार आहे.तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे वाहन जिथे उभे असेल तिथे कोणत्याही वाहनास उभे करता येणार नाही.तसेच मंत्रालयात आणि मंत्रालयाबाहेर पार्किंग असणाऱ्या वाहन चालकांनी त्यांचे वाहन सोडून इतरत्र न जाण्याच्या वाहन चालकांना सूचना देण्यात येणार आहेत.

कलर कोड एंट्री पास : मंत्रालयामध्ये प्रवेश करण्याऱ्या व्यक्तींना आरएफआयडी(RFID) स्वरूपाचे प्रवेश पत्रिका देण्यात येणार आहे.जो पर्यंत आरएफआयडी स्वरूपाची प्रवेश पत्रिका देण्याची कार्यवाही सुरु होत नाही , तो पर्यंत मंत्रालयामध्ये प्रत्येक मजल्यासाठी कलर कोड पत्रिका देण्याची व्यवस्था मंत्रालय सुरक्षा विभागामार्फत करण्यात येणार आहे. कलर कोड पत्रिका प्रत्येक मजल्यासाठी वेगळी असणार आहे.जर अभ्यागतांनी अन्य मजल्यावर प्रवेश केला तर त्याला पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

 

सर्व प्रकारच्या कंत्राटी कामगारांचे सीसीटीएनएस तपासणी: सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागांमार्फत मंत्रालयात खाजगी कर्मचाऱ्यांना प्रवेश द्यावयाचा असल्यास आधार कार्डद्वारे आणि सीसीटीएनएस यंत्रणेद्वारे त्यांची तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे.तसेच मंत्रालयीन टेरेसवर जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहे.मंत्रालयाच्या मोकळ्या कॉरिडॉर मध्ये खिडक्यांमधून, मंत्रालयाच्या मोकळ्या जागेवरून कोणतीही व्यक्ती उडी मारू नये यासाठी इन्व्हिसिबल स्टील रोप्स लावण्यात येणार आहे. तसेच मंत्रालय परिसरात भटके कुत्रे, मांजर याना प्रतिबंध करण्यात येणार आहे.मंत्रालयामध्ये आता सायकल स्टॅण्ड देखील बनवण्यात येणार आहे.

 

Exit mobile version