‘ऑपरेशन सिंदूर’मुळे चीनलाही कसा बसला झटका

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे चीनलाही कसा बसला झटका

भारतीय लष्कराने दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे फक्त पाकिस्तानच नव्हे तर चीनलाही मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी चीनी डिफेन्स कंपनी ‘जुझोउ होंगडा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्प लिमिटेड’च्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली. हीच ती कंपनी आहे, ज्याच्या ‘पीएल-१५’ या क्षेपणास्त्राला पाकिस्तानसोबत संघर्षादरम्यान भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हवेतच पाडले होते.

भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केल्यानंतर चिडलेल्या पाकिस्तानी लष्कराने चीनी ‘पीएल-१५’ क्षेपणास्त्राद्वारे भारतातील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या मजबूत संरक्षण यंत्रणेने त्या क्षेपणास्त्राला चुटकीसरशी निष्प्रभ केले. माहितीनुसार, ९ आणि १० मेच्या रात्री पाकिस्तानने भारताच्या एअरफोर्स बेस आणि लष्करी सुविधांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्यांनी चीनी पीएल-१५ क्षेपणास्त्र आणि तुर्कीये निर्मित बायकर वायआयएचए-३ कामिकेज ड्रोनचा वापर केला.

हेही वाचा..

तिरंगा यात्रेत सैन्याच्या पराक्रमाला करणार सलाम

बुमराहला टेस्ट कर्णधारपदाची जबाबदारी द्या

पाकिस्तानने फक्त ट्रेलर पहिला…

ऑस्ट्रेलियाची शक्ती पुन्हा लॉर्ड्सवर तळपणार?

भारताच्या एअर डिफेन्सने पाकिस्तानने दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी केलेले हे सर्व हल्ले यशस्वीरित्या निष्फळ ठरवले. पीएल-१५ हे एक एअर-टू-एअर क्षेपणास्त्र आहे, जे जेएफ-१७ आणि जे-१० फाइटर जेटद्वारे वापरले जाते. भारताने हे क्षेपणास्त्र सहजपणे निष्प्रभ केल्यानंतर चीनी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. परिणामी, गुंतवणूकदारांचा चीनी डिफेन्स सेक्टरवरील विश्वास कमी झाला आणि ‘जुझोउ होंगडा’च्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.

भारताचे एअर ऑपरेशन्स डायरेक्टर जनरल, एअर मार्शल एके भारती यांनी निष्फळ केलेल्या शस्त्रास्त्रांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन केले आणि दाखवले की भारतीय संरक्षण यंत्रणेने हाय-टेक्नोलॉजी मिसाइल्स आणि ड्रोन कसे नष्ट केले. त्यांनी या धोक्याला निष्प्रभ करण्याचे श्रेय स्वदेशी ‘आकाश’ एअर डिफेन्स सिस्टमला दिले. तुर्कीये निर्मित बायकर वायआयएचए-३ कामिकेज ड्रोनलाही लष्कराने अमृतसरमध्ये ओळखून पाडले. या ड्रोनमध्ये मोठा पेलोड वाहून नेण्याची, कमी उंचीवरून उड्डाण करण्याची आणि वेगवान हल्ला करण्याची क्षमता आहे. या ड्रोनचा उद्देश लष्करी किंवा नागरी ठिकाणांना मोठे नुकसान पोहोचवणे होता, पण ते भारताच्या सुरक्षा यंत्रणेला भेदण्यात अपयशी ठरले.

Exit mobile version