२०२५ ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप! क्रिकेटचं सर्वात मोठं आणि प्रतिष्ठेचं मैदान – लॉर्ड्स.
११ ते १५ जून दरम्यान…
एकीकडे गतविजेता ऑस्ट्रेलिया, आणि दुसरीकडे इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचलेली दक्षिण आफ्रिका!
आणि आज… ऑस्ट्रेलियन संघाची १५ सदस्यीय अंतिम यादी जाहीर झाली आहे.
💥 टीम ऑस्ट्रेलिया – WTC 2025 Final साठी सज्ज!
कॅमेरून ग्रीन – तब्बल १२ महिन्यांनंतर पुनरागमन!
मागील वर्षी झालेल्या कंबरेच्या शस्त्रक्रियेनंतर तो खेळू शकत नव्हता, IPL देखील मिस केला… पण आता तो पुन्हा मैदानावर उतरायला तयार आहे – पूर्ण ताकदीने!
पॅट कमिन्स – पुन्हा एकदा संघाचा कर्णधार.
जोश हेजलवूड – फिट होऊन संघात परतला.
या दोघांनी श्रीलंका दौरा गमावला होता, पण आता ते फायनलसाठी सज्ज आहेत.
स्टीव्ह स्मिथ उपकर्णधार,
तर ब्रेंडन डॉगेट ट्रॅव्हलिंग रिझर्व्हमध्ये.
ऑस्ट्रेलियाची १५ सदस्यीय टीम:
-
पॅट कमिन्स (कर्णधार)
-
स्कॉट बोलंड
-
एलेक्स कॅरी
-
कॅमेरून ग्रीन
-
जोश हेजलवूड
-
ट्रॅव्हिस हेड
-
जोश इंग्लिस
-
उस्मान ख्वाजा
-
सॅम कोंस्टास
-
मॅट कुहनेमन
-
मार्नस लाबुशेन
-
नॅथन लायन
-
स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार)
-
मिचेल स्टार्क
-
ब्यू वेबस्टर
ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह: ब्रेंडन डॉगेट
🏏 दोन दिग्गज… एक विजेतेपद…
-
ऑस्ट्रेलिया – १९ सामने, १३ विजय, ४ पराभव, २ बरोबरी.
-
दक्षिण आफ्रिका – १२ सामने, ८ विजय, ३ पराभव, १ बरोबरी.
२०२३ मध्ये भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा WTC ट्रॉफी जिंकली होती.
या वर्षीही ताजावर त्यांची नजर आहे… पण यावेळी समोर आहे… दक्षिण आफ्रिकेची आग्रही, जिद्दी आणि इतिहास घडवण्यासाठी झपाटलेली टीम!
🔥 संपूर्ण जगाची नजर ११ जूनपासून लॉर्ड्सवर असणार आहे…
कौन बनेगा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन २०२५?
