30.3 C
Mumbai
Saturday, June 6, 2026
घरबिजनेसअमेरिकेच्या ब्लूमबर्गने भारताच्या सोने विक्रीसंदर्भातील खोटी बातमी हटवली

अमेरिकेच्या ब्लूमबर्गने भारताच्या सोने विक्रीसंदर्भातील खोटी बातमी हटवली

Google News Follow

Related

अमेरिकन वृत्तसंस्था ब्लूमबर्गने इराण युद्धामुळे परकीय चलन मालमत्ता सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (RBI) ने अब्जावधी डॉलर किमतीचे सोने विकल्याचा दावा केला होता. पण हा दावा करणारा आपला खोटा लेख त्यांनी मागे घेतला आहे. या गंभीर चुकीसाठी संस्थेने “ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या चुकीच्या विश्लेषणाला” जबाबदार धरले.

“२ जून रोजी प्रकाशित करण्यात आलेली बातमी ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या चुकीच्या विश्लेषणावर आधारित होती, त्यामुळे ब्लूमबर्ग न्यूज ती मागे घेत आहे. या विश्लेषणात आरबीआयच्या सोन्याच्या साठ्याचे मूल्यांकन करण्यासाठी त्याच दिवसाच्या देशांतर्गत सोन्याच्या किंमतींचा चुकीचा वापर करण्यात आला. मागील दिवसाच्या लंडन बुलियन मार्केटच्या किंमती वापरल्यास मे महिन्यातील सोन्याचा साठा बदललेला नसल्याचे दिसते,” असे दक्षिण आशियाच्या कार्यकारी संपादक जेनेट रॉ़ड्रिग्ज यांनी प्रसिद्ध केलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.

रिझर्व्ह बँके ने ब्लूमबर्गचा दावा आणि तो पुढे नेणाऱ्या भारतीय माध्यमांच्या वृत्तांचे जोरदार खंडन केले. आरबीआयने स्पष्ट केले की त्यांचा प्रत्यक्ष सोन्याचा साठा ८८०.५२ मेट्रिक टन इतकाच आहे. “रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सोन्याच्या विक्रीबाबत काही माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या आरबीआयच्या निदर्शनास आल्या आहेत. आरबीआय स्पष्ट करते की या बातम्या चुकीच्या आहेत,” असे बँकेने म्हटले. केंद्रीय बँकेने जनतेला अधिकृत मासिक बुलेटिनमधील आकडेवारीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.

ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या अहवालात आरबीआयने परकीय चलन मालमत्तेला आधार देण्यासाठी सुमारे १२ अब्ज डॉलर किमतीचे सोने विकले असावे, असा दावा करण्यात आला होता. अमेरिका-इराण संघर्षामुळे ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेली, रुपयाचे मूल्य डॉलरमागे सुमारे ९७ पर्यंत घसरले आणि भांडवली बाहेर पडणे वाढले, त्यामुळे रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली असावी असे त्या अहवालात म्हटले होते.

मात्र आरबीआयने स्पष्ट केले की, “आजच्या तारखेपर्यंत सोन्याचा भौतिक साठा ८८०.५२ टन इतकाच कायम आहे.” २२ मे २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या आरबीआयच्या मासिक बुलेटिननुसार (२४ एप्रिल २०२६ पर्यंतची आकडेवारी), सोन्याचा साठा ८८०.५२ मेट्रिक टन इतकाच स्थिर आहे. २४ एप्रिल २०२६ रोजी या सोन्याच्या साठ्याचे मूल्य ₹११, ३३, ०७६ कोटी (सुमारे १२०.२३६ अब्ज डॉलर) इतके होते.

हे ही वाचा:

अण्णामलाई यांचा भाजपला रामराम; राजीनामा स्वीकारला

भारताला एसयू-५७ स्टेल्थ फायटरच्या संयुक्त निर्मितीचा रशियाकडून प्रस्ताव

सेबीच्या कारवाईने राजेश एक्सपोर्ट्सला मोठा धक्का

भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ ठरणार!

आकडेवारीनुसार, २७ मार्च २०२६ रोजी आरबीआयकडे ८८०.३४ मेट्रिक टन सोने होते, जे ३ एप्रिल रोजी ८८०.५२ मेट्रिक टन झाले. यामुळे केंद्रीय बँकेच्या सोन्याच्या साठ्यात किरकोळ वाढ झाल्याचे दिसून येते आणि सोन्याच्या एकूण प्रमाणात कोणतीही घट झालेली नाही.

हा साठा भारताच्या एकूण परकीय चलन साठ्याचा भाग आहे. २४ एप्रिल २०२६ रोजी भारताचा एकूण परकीय चलन साठा ₹ ६५, ८२,३८७ कोटी (सुमारे ६९८.४८७ अब्ज डॉलर) इतका होता. बुलेटिनमध्ये रुपया आणि डॉलरमधील मूल्यांमध्ये बाजारभावानुसार किरकोळ चढउतार दिसतात, परंतु प्रत्यक्ष सोन्याचे प्रमाण आठवड्यानंतर आठवडा स्थिर राहिले आहे. ही तथ्ये समोर आल्यानंतर ब्लूमबर्गने आपला चुकीचा अहवाल मागे घेतला आणि “चुकीचे विश्लेषण” हे त्यामागचे कारण असल्याचे मान्य केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
311,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा