देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींची पहिली भेट कशी होती?

मुख्यमंत्र्यांनी सांगितली आठवण

देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींची पहिली भेट कशी होती?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची त्यांची आठवण सांगितली आहे. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या भेटीच्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला आहे. तसेच त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या जीवनावर कसा प्रभाव पाडला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये व्हिडीओ शेअर करत नागपूरमधील भेटीचा उल्लेख केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, “जेव्हा मी पहिल्यांदा नरेंद्र मोदींना भेटलो तेव्हा कल्पनाही नव्हती की हा क्षण मनावर इतका खोलवर छाप सोडेल. त्यावेळी मी एक तरुण महापौर होतो आणि माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिकण्यास नेहमीच उत्सुक असे. तसेच भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूरचा अध्यक्षही होतो. त्यावेळी एक कार्यशाळा रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. आम्ही सर्व पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था केली होती. सर्व मान्यवरांसाठीही विश्रामगृहे राखीव होती.”

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नरेंद्र मोदी हे या कार्यशाळेसाठी आले तेव्हा त्यांनी प्रथम डॉ. हेडगेवार यांच्या समाधीला आदरांजली वाहिली. त्यानंतर मी स्वतः त्यांना विचारले की, त्यांची राहण्याची सोय कुठे करू? मला वाटले होते की, ते इतर नेत्यांसोबत विश्रामगृहात सोय करायला सांगतील. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्याऐवजी, त्यांनी फक्त असे सांगितले की त्यांना रेशमबागमध्ये संघ कार्यकर्त्यांसाठी बनवलेल्या एका छोट्या खोलीत राहायचे आहे. त्यांची इच्छा ऐकून मला आश्चर्य वाटले,” अशी आठवण त्यांनी सांगितली.

हे ही वाचा : 

… म्हणून ट्रम्प ‘न्यू यॉर्क टाईम्स’वर मानहानीचा खटला दाखल करणार!

आसाम सिव्हिल सर्व्हिसमधील महिला अधिकाऱ्याच्या घरावर छापे

डेहराडूनमध्ये ढगफुटी, दोघे बेपत्ता; मुसळधार पावसात वाहने आणि दुकाने वाहून गेली!

स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला दोन सुवर्णपदके

नरेंद्र मोदींची नम्रता आणि संघाच्या परंपरेशी असलेले त्यांचे खोल नाते यातून दिसून येते. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीकडे लक्ष दिले आणि सर्व सहभागींना आरामदायी वाटेल याची विशेष काळजी घेतली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या या पहिल्या भेटीने मनावर खोलवर छाप पाडली. मी असा नेता पाहिला जो साधेपणाला आणि पदापेक्षा सेवेला जास्त महत्त्व देत असे आणि त्यांची ती प्रतिमा नेहमीच माझ्या मनात राहिली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Exit mobile version