लॉर्ड्स टेस्टमध्ये भारतावर अवघ्या २२ धावांनी मिळवलेला थरारक विजय इंग्लंडसाठी महागात पडला आहे. स्लो ओव्हर-रेटमुळे आयसीसीने इंग्लंडवर १० टक्के मॅच फीचा दंड ठोठावला असून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्स टेबलमधून २ गुण वजा करण्यात आले आहेत.
आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, वेळेत ठरवलेले ओव्हर्स पूर्ण न केल्यास प्रत्येक ओव्हरसाठी खेळाडूंच्या मॅच फीचा ५ टक्के दंड आकारला जातो. याच नियमांतर्गत इंग्लंडवर ही कारवाई करण्यात आली आहे.
वेळेत ओव्हर्स न पूर्ण केल्यास प्रत्येक कमी पडलेल्या ओव्हरसाठी एक गुण कापला जातो. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने चूक स्वीकारत दंड स्वीकारला असल्याने, कोणतीही औपचारिक सुनावणी झाली नाही.
हा आरोप अंपायर पॉल रीफेल, शरफुद्दौला इब्ने शाहिद, थर्ड अंपायर अहसान रजा आणि फोर्थ अंपायर ग्राहम लॉयड यांनी लावला होता.
डब्ल्यूटीसी टेबलवर परिणाम:
-
इंग्लंडचे गुण २४ वरून २२ वर आले
-
पर्सेंटेज ६६.६७% वरून ६१.११% झाला
-
यामुळे इंग्लंड दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरला
-
श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर पोहचला
-
ऑस्ट्रेलिया पहिल्या तर भारत चौथ्या स्थानी आहे
हेही वाचा:
राहुल गांधी हे सवयीचे गुन्हेगार
मोगलपुरात ऐजाज रेसिडेन्सी इमारतीला आग
मुंबई सेंट्रलला ज्यांचे नाव दिले जाणार ते समाजहितदक्ष नाना शंकरशेठ कोण होते?
पद्मभूषण राजदत्त आणि पद्मश्री वासुदेव कामत यांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम—अभ्यासोनी प्रकटावे!
लॉर्ड्स टेस्टमध्ये पहिल्या डावात दोन्ही संघांनी समान धावा केल्या होत्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात १९३ धावांचे आव्हान ठेवले. रवींद्र जडेजाने नाबाद ६१ धावा करत संघाला जिंकवण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताचा डाव १७० धावांवर आटोपला.
पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड २-१ ने आघाडीवर असून, पुढील सामना २३ जुलै रोजी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर होणार आहे.
