“बिहारात INDI आघाडीची दिशा भरकटली, लोकांचा विश्वास उडाला”

भाजप नेते सी. आर. केशवन यांची टीका 

“बिहारात INDI आघाडीची दिशा भरकटली, लोकांचा विश्वास उडाला”

भाजप नेते सी. आर. केशवन यांनी आज (२५ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना इंडी आघाडीवर जोरदार टीका केली. एसआयआर प्रकरणावरून काँग्रेस आणि आरजेडी करत असलेल्या आरोपांना त्यांनी ‘वाईट आणि दिशाभूल करणारे’ म्हणत फेटाळून लावले. एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, “लोकशाही संस्थांना टार्गेट करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न आणि काँग्रेस-आरजेडीकडून एसआयआर आणि बिहार संदर्भात चालवलेल्या खोट्या माहितीच्या प्रचारामुळे इंडी आघाडी पूर्णपणे आपला दृष्टिकोन गमावून बसला आहे.”

ते पुढे म्हणाले, “राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील इंडी आघाडीने लोकांचा विश्वास गमावला आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी NDA सरकारने बिहारमध्ये केलेली कामगिरी ठामपणे मांडली आहे. त्यांनी NDA आघाडीचं भविष्यातील व्हिजनही स्पष्टपणे समोर ठेवलं आहे. याउलट, राहुल गांधी आणि इंडी आघाडी केवळ भीती पसरवण्याचं राजकारण करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, बिहारमध्ये मतदार याद्यांतील बदल आणि एसआयआर प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस व RJD ने भाजपवर मतदारांचे अधिकार हिरावण्याचा आरोप केला आहे. याला प्रत्युत्तर देताना भाजपने विरोधकांवर “फेक प्रचार आणि लोकशाही संस्थांचा अवमान” असा पलटवार केला आहे. दरम्यान, मतचोरीचा आरोप करत सरकार विरोधात राहुल गांधींची बिहारमध्ये ‘मतदार अधिकार यात्रा’ सुरु आहे. इंडी आघाडीतील सहभागी पक्ष राहुल गांधींसोबत मोर्चेत सहभागी होत आहेत.

Exit mobile version