बिहार निवडणुकांपूर्वी मतांची चोरी आणि SIR प्रक्रियेविरोधात INDIA आघाडीचा निषेध!

सरकार विरोधात घोषणाबाजी 

बिहार निवडणुकांपूर्वी मतांची चोरी आणि SIR प्रक्रियेविरोधात INDIA आघाडीचा निषेध!

बिहारमध्ये निवडणुका जवळ आल्या असताना निवडणूक आयोगाने मतदार यादीत घेतलेल्या “विशेष सखोल पुनरिक्षण” (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेविरोधात आणि ‘मतांची चोरी’ (vote chori) केल्याच्या आरोपांवरून इंडी आघाडीच्या खासदारांनी आज (१९ ऑगस्ट) निषेध आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

इंडी आघाडीतील घटक पक्ष कॉंग्रेस, आरजेडी आणि इतर डाव्या पक्षांच्या खासदारांनी दिल्लीतील संसद परिसरात हे निषेध आंदोलन केले. यावेळी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह आदी खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपा आणि भारत निवडणूक आयोगावर मतांची चोरी करण्याचा आरोप केला. बिहारसारख्या निवडणूकपूर्व राज्यांमध्ये मतदार यादीतील फेरबदल, मतदारांना हटवणे आणि पक्षपाती प्रक्रिया सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. “Special Intensive Revision” ही प्रक्रिया भाजपच्या दबावाखाली केली जात आहे, असा आघाडीचा आरोप आहे.

“मतांची चोरी थांबवा, निवडणूक आयोग तटस्थ राहा, लोकशाहीचे रक्षण करा”, अशा आंदोलक खासदारांनी घोषणा दिल्या. त्यांनी निवडणूक आयोगाकडे संपूर्ण पारदर्शक आणि स्वतंत्र यादी पुनरावलोकन करण्याची मागणी केली. आघाडीने सांगितले की, “निवडणूक आयोग हे लोकशाहीचे रक्षक आहे, पण जर ते पक्षपाती वर्तन करत असेल तर तो लोकशाहीसाठी धोका ठरेल.”

हे ही वाचा : 

या मंदिरात दररोज वाढते गणपतीची मूर्ती

‘बोगस मतांच्या’ दाव्याची याचिका फेटाळताच, राऊत म्हणाले- लढा संपला नाही!

उत्तराखंडच्या ‘खुनी’ या गावाचे नाव बदलून ठेवले ‘देविग्राम’, कारण काय? 

मुंबईकरांनो… पाऊस कोसळतोय, काळजी घ्या

दरम्यान, Special Intensive Revision (SIR) ही मतदार यादीतील दुरुस्ती प्रक्रिया आहे जी निवडणुकीपूर्वी घेतली जाते. मात्र, इंडी आघाडीचा आरोप आहे की या प्रक्रियेत विरोधकांचे मतदार हटवले जात आहेत. बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका अपेक्षित असून, या पार्श्वभूमीवर ही कारवाई राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनली आहे.

Exit mobile version