उपराष्ट्रपतीपदासाठी बी. सुदर्शन रेड्डी यांचे नामांकन

सोनिया गांधींसह खर्गे, राहुल गांधी, शरद पवार उपस्थित 

उपराष्ट्रपतीपदासाठी बी. सुदर्शन रेड्डी यांचे नामांकन

इंडी आघाडीच्या वतीने उपराष्ट्रपती पदासाठी नामनिर्देशित करण्यात आलेले माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी आज (२१ ऑगस्ट) अधिकृतपणे आपले नामांकन दाखल केले. या वेळी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते.

याशिवाय, राष्ट्रवादीचे शरद पवार, समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव, DMK चे खासदार तिरुची शिवा, तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि इतर अनेक आघाडीतील नेतेही या वेळी उपस्थित होते.  दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी (२० ऑगस्ट) नवी दिल्ली येथे औपचारिकपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

नामांकन पत्रांच्या पहिल्या संचात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्य प्रस्तावक होते तर गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि एनडीए मित्रपक्षांचे नेते देखील उपस्थित होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी आरोग्य कारणांमुळे पदाचा राजीनामा होता. त्यानंतर ही निवडणूक होत आहे. दरम्यान, ही निवडणूक ९ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडणार असून, त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे.

हे ही वाचा : 

‘भारतासोबतचे संबंध तोडणे हे धोरणात्मक आपत्ती ठरेल’

भारतात अटक केलेली एफबीआयची मोस्ट वॉन्टेड फरारी ‘सिंडी सिंग’ कोण आहे?

मीठी नदी घोटाळा प्रकरण : मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूकडून ठेकेदार शेरसिंह राठोड याला अटक

मारहाणीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री गुप्ता यांच्या सुरक्षेत मोठा बदल!

उपराष्ट्रपती निवडणुकीचे वेळापत्रक

  • निवडणूक आयोगाने जारी केलेली अधिसूचना – ०७ ऑगस्ट, २०२५ 
  • नामांकनाची शेवटची तारीख – २१ ऑगस्ट २०२५ 
  • नामांकन अर्जांची छाननी तारीख – २२ ऑगस्ट २०२५ 
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – २५ ऑगस्ट २०२५ 
  • मतदान कोणत्या दिवशी होईल – ०९ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत. 
  • मतमोजणी – ०९ सप्टेंबर, २०२५  रोजी होणार असल्याची माहिती आहे.  
Exit mobile version