भारत-अमेरिका व्यापार करारासाठी पुन्हा चर्चा सुरू; ट्रम्पच्या ५०% करानंतर प्रथमच चर्चा!

अमेरिकेच्या बाजूने ब्रेंडन लिंच तर भारताच्या बाजूने राजेश अग्रवाल प्रतिनिधित्व करताहेत 

भारत-अमेरिका व्यापार करारासाठी पुन्हा चर्चा सुरू; ट्रम्पच्या ५०% करानंतर प्रथमच चर्चा!

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतीय निर्यातीवर ५० टक्के दंडात्मक कर लादल्यानंतर काही आठवड्यांनंतर, मंगळवारी (१६ सप्टेंबर) भारत आणि अमेरिका एका महत्त्वपूर्ण व्यापार करारावर काम करण्यासाठी पुन्हा एकदा वाटाघाटीच्या टेबलावर आले आहेत.

अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नवी दिल्लीत आगमन झाल्यानंतर व्यापार चर्चा सुरू झाली असून, वॉशिंग्टनकडून मागील काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या निषेधानंतर द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारण्याचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारताशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांत डोनाल्ड ट्रम्प यांचा सूरही हळूहळू मवाळ होत असल्याचे दिसून येत आहे.

दिवसभर चालणाऱ्या या व्यापार वाटाघाटींमध्ये अमेरिकेच्या बाजूने दक्षिण आशियासाठी व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच नेतृत्व करत आहेत, तर भारताच्यावतीने वाणिज्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी राजेश अग्रवाल प्रतिनिधित्व करत आहेत, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. या चर्चेत परराष्ट्र मंत्रालयाचाही सक्रिय सहभाग आहे.

गेल्या आठवड्यात, माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापार करार होण्याबाबत आशावाद व्यक्त केला. याला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, व्यापार वाटाघाटी “भारत-अमेरिका भागीदारीच्या अमर्याद क्षमतांना उजाळा देण्याचा मार्ग मोकळा करतील.”
दरम्यान, योगायोगाने, व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी सोमवारी असे वक्तव्य केले की, “भारत आता वाटाघाटीच्या टेबलावर येत आहे.” परंतु, पीटर नवारो असे दावे करीत असले तरी वास्तविकपणे वॉशिंग्टनच्या अधिकाऱ्यांचे दिल्लीत दाखल होणे सूचित करते कि अमेरिकेला व्यापार करारात भारतासारख्या गतीने विकास करणाऱ्या अर्थव्यवस्थेशी आणि १४० कोटीच्या बाजार पेठेशिवाय गत्यंतर नाही. हे ट्रम्प यांना कळून चुकले आहे.
अलिकडच्या आठवड्यात, ट्रम्पने भारतीय वस्तूंवर असलेल्या २५ टक्के करांवर २५ टक्के दंड लादल्यानंतर, नवारोने भारतावर हल्ला चढवला होता. त्यांनी नवी दिल्लीवर युक्रेनमधील मॉस्कोच्या युद्धातून नफा कमावल्याचा आरोप केला आणि त्याला क्रेमलिनचे “लँड्रोमॅट” असे संबोधले.
Exit mobile version