वाजवितो पावा… जमल्या नाहीत हो इंग्लंडला पस्तिस धावा!

वाजवितो पावा… जमल्या नाहीत हो इंग्लंडला पस्तिस धावा!

“कितने आदमी थे?”
“चार सरकार… शेवटच्या दिवशी फक्त चार विकेट्स लागायच्या होत्या!”
आणि त्या चार विकेट्सवरच इंग्लंडची संपूर्ण स्वप्ननगरी कोसळली!

केंनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर भारताने जिंकला एक असा सामना, जो काळजाचा ठोका चुकवणारा होता… आणि त्याचबरोबर भारताने ही टेस्ट सिरीज २-२ ने बरोबरीत संपवली.

पहिला डाव – गारठलेली सुरुवात

टॉस हरलो आणि फलंदाजी घेतली.
पण वाटलं होतं तसं काही घडलं नाही.
करुण नायरने ५७ धावा केल्या, पण संपूर्ण टीम २२४ वर गुंडाळली गेली.
गस एटकिंसनने पाच झटपट विकेट्स घेतल्या… म्हणजे एखाद्याला विचारावं – “या माणसाने आमचा पत्त्यांचा बंगला कसा उडवला?”

इंग्लंडचा पहिला डाव – थोडी झेप, थोडा अडथळा

इंग्लंडनं पहिल्या डावात २४७ केल्या.
२३ धावांची आघाडी – म्हणजे काही विशेष नाही, पण आत्मविश्वास देणारी.
क्रॉली ६४, ब्रूक ५३, आणि तिकडून
सिराज + प्रसिद्ध कृष्णा = चार-चार शिकार!

दुसरा डाव – जायसवालची जबरदस्त शतकी खेळी

७० वर २ विकेट्स गेल्यावर… एकच प्रश्न – पुन्हा गडबड का?
पण मग आलं जायसवाल नावाचं वादळ – ११८ धावांची झुंजार खेळी.
सोबत आकाश दीपचा ६६, जडेजा आणि सुंदर – दोघेही अर्धशतकवीर.
भारताचं स्कोअर – लखलखीत ३९६.

टार्गेट – इंग्लंडला ३७४!

शेवटचा डाव.
इंग्लंडनेही सुरुवात चांगली केली – क्रॉली १४, डकेट ५४.
मग ओली पोप गेले… आणि
रूट + ब्रूकने फोडून काढलं – १९५ धावांची भागीदारी.

हे सगळं पाहून वाटलं – संपलं आता!
पण…

शेवटचा दिवस – थराराचा टॉप गियर!

फक्त ३५ धावांची गरज… आणि अजून चार विकेट्स शिल्लक!
तेव्हाच स्मिथ आउट झाला… मग एक एक विकेट जणू पतंगासारखी कापली!
भारताचा संपूर्ण प्लॅन अचूक बसला.
इंग्लंड – ३६७ ऑल आऊट!

शेवटचा श्वास, पण सिंहगर्जनेत विजय!

भारताने ६ धावांनी सामना जिंकला.
कोण म्हणालं टेस्ट क्रिकेट कंटाळवाणं असतं?

हा सामना म्हणजे ‘शोले’चा क्लायमॅक्स होता

सिरीजचा नाट्यमय प्रवास:

Exit mobile version