चेन्नईत भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले; वैमानिक बचावला

चेंगलपट्टू जिल्ह्यात झाला अपघात

चेन्नईत भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले; वैमानिक बचावला

चेन्नईमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळून मोठा अपघात झाला आहे. चेन्नईच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील तांबरमजवळ हा अपघात झाला. भारतीय हवाई दलाचे ‘पिलाटस पीसी- ७’ हे विमान कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पीटीआय या वृत्तसंस्थेने अपघातस्थळाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अपघातग्रस्त विमानाचे अवशेष जमिनीवर पसरलेले दिसत आहेत आणि स्थानिक लोक घटनास्थळी जमले आहेत. नियमित प्रशिक्षण मोहिमेवर असताना संबंधित विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. विमानातून सुरक्षितपणे बाहेर पडल्यानंतर वैमानिक बचावण्यात यशस्वी झाला आहे. भारतीय हवाई दलाने नंतर अपघाताची पुष्टी केली आहे.

हे ही वाचा..

“बिहार निवडणुकीचा निकाल निराशाजनक; काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज”

‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ने अल- फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व केले निलंबित

“बिहार जिंकले आता लक्ष्य पश्चिम बंगालवर”

‘त्या’ क्लिपबद्दल बीबीसीने ट्रम्प यांची माफी मागितली पण नुकसानभरपाई देण्यास नकार

भारतीय हवाई दलाने सांगितले की, या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. “भारतीय हवाई दलाचे PC-7 Mk II प्रशिक्षण विमान नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान अपघातग्रस्त झाले आणि आज चेन्नईतील तांबरमजवळ सुमारे १४.२५ वाजता कोसळले. पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला आणि नागरी मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी न्यायालय स्थापन करण्यात आले आहे,” असे हवाई दलाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version