दुबई एअर शोमध्ये भारताचे तेजस लढाऊ विमान शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी कोसळले. स्थानिक वेळेनुसार दुपारी २:१० वाजता हा अपघात झाला. या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये विमान कोसळताच आगीचा मोठा भडका उडाल्याचे पाहायला मिळत आहे. चिंतेची बाब म्हणजे अपघातादरम्यान पायलटने स्वतःला इजेक्ट केल्याचे दिसत नसून त्यामुळे पायलट बचावला की नाही याबद्दल शंका उपस्थित होत आहे.
तेजस हे लढाऊ विमान दुबई एअर शोमध्ये आपल्या कसरती करत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तेजस लढाऊ विमान अचानक खाली येते आणि स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. यानंतर विमानतळावर काळे धुराचे लोट पसरले आणि आपत्कालीन मदत करणारे पथक घटनास्थळी पोहोचले. या घटनेला दुजोरा देताना, आयएएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “दुबई एअर शो-२५ मध्ये आयएएफचे तेजस विमान कोसळले आहे. सध्या अधिक माहिती घेतली जात आहे. लवकरच अधिक माहिती देण्यात येईल.
हे ही वाचा:
स्फोटकांमधील रसायने तयार करण्यासाठी डॉ. मुझम्मिलकडून पिठाच्या गिरणीचा वापर
देशभरातील घुसखोरांना शोधून हाकलणार!
जगातील प्रत्येक पाच आयफोनपैकी एक आयफोन तयार होतो भारतात
“बेंगळुरूच्या रहदारीतून प्रवास करण्यापेक्षा अंतराळात प्रवास करणे सोपे”
एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीद्वारे डिझाइन केलेले आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे निर्मित, तेजस हे भारतातील पहिले स्वदेशी विकसित लढाऊ विमान आहे. या विमानात विदेशी इंजिन आहे. भारतीय हवाई दल सध्या तेजस लढाऊ विमानाच्या Mk1 प्रकाराचे ऑपरेशन करते आणि Mk1A प्रकाराच्या वितरणाची वाट पाहत आहे. तेजस लढाऊ विमान कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २०२४ मध्ये जैसलमेरमध्येही तेजस विमानाचा अपघात झाला होता.
