पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारातील ग्रामीण महिलांसाठी ‘बिहार राज्य जीविका निधी साख सहकारी संघ लिमिटेड’ चे उद्घाटन केले. या वेळी त्यांनी काँग्रेस-राजदवर जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले की बिहारमध्ये जे घडले, त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. ‘आईचा अपमान’ हा अत्यंत वेदनादायक होता. कार्यक्रमादरम्यान आपल्या आईचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, “माझ्या ‘आई’चा काँग्रेस-राजदच्या मंचावर अपमान केला गेला. हा माझ्या आईचाच नाही, तर प्रत्येक ‘आई’चा अपमान आहे.”
मोदी म्हणाले, “आमच्या सरकारसाठी आईची गरिमा, तिचा सन्मान आणि तिचा स्वाभिमान ही अतिशय मोठी प्राथमिकता आहे. या संस्कारवान बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी जे घडलं, त्याची मी कल्पनाही केली नव्हती. बिहारमध्ये राजद-काँग्रेसच्या मंचावर माझ्या आईला शिव्या घातल्या गेल्या. हा फक्त माझ्या आईचा अपमान नाही, तर देशातील मातां, बहिणी आणि मुलींचा अपमान आहे. हे पाहून आणि ऐकून तुम्हा सर्वांना, बिहारमधील प्रत्येक आईला किती वाईट वाटले असेल, हे मला ठाऊक आहे. जसा वेदनेचा डोंगर माझ्या हृदयावर आहे, तसाच तो बिहारच्या जनतेच्या हृदयावरही आहे.”
हेही वाचा..
मुस्लीम संघटनांपुढे ममता सरकार झुकले, जावेद अख्तर यांचा कार्यक्रम रद्द!
इस्रो लॅबमधून तयार पहिली स्वदेशी ३२ -बिट चिप ‘विक्रम’ सादर
दिल्लीत थल सैनिक शिबिराची सुरुवात
‘वोटर अधिकार यात्रा’ अपयशी ठरली
ते पुढे म्हणाले, “मीदेखील एक मुलगा आहे आणि इतक्या माताभगिनींना पाहून आज मी माझं दुःख तुमच्यासमोर मांडत आहे, जेणेकरून तुमच्या आशीर्वादाने मी ते सहन करू शकेन. मी जवळपास ५५ वर्षांपासून समाज आणि देशसेवेत गुंतलेलो आहे. समाजासाठी माझ्याकडून जे काही शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न केला आहे. असं करण्यासाठी मला माझ्या आईचे आशीर्वाद लाभले आहेत. माझ्या आईने मला भारतमातेची सेवा करण्यास सांगितले, पण मला या गोष्टीची वेदना आहे की, ज्यांनी मला देशसेवेसाठी पाठवले, त्यांचाच अपमान केला गेला.”
मोदींनी काँग्रेसवर टीका करताना म्हटलं, “तुम्हा सर्वांना माहीत आहे की आता माझी आई या जगात नाही. काही काळापूर्वी १०० वर्ष पूर्ण करून त्यांनी आम्हाला सोडून दिलं. माझ्या त्या आईचा, ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता, ज्यांचं शरीरही आता या जगात नाही. माझ्या त्या आईला राजद-काँग्रेसच्या मंचावर घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. हा अत्यंत दुःखद, क्लेशदायक आणि वेदनादायक प्रकार आहे. त्या आईचं काय चुकलं होतं की तिला अशा शिव्या दिल्या गेल्या?” ते पुढे म्हणाले, “एका मुलाची पीडा शाही घराण्यातील लोक समजूच शकत नाहीत. अतोनात गरीबीमध्ये माझ्या आईनं मला वाढवलं. आईचं स्थान हे देवस्थानापेक्षाही उंच आहे आणि तिचाच अपमान करण्यात आला.”
