अमित शहा बनावट व्हीडिओ प्रकरणी जिग्नेश मेवानीचा पीए आणि आपचा नेता अटक!

अहमदाबाद सायबर गुन्हे शाखेची कारवाई

अमित शहा बनावट व्हीडिओ प्रकरणी जिग्नेश मेवानीचा पीए आणि आपचा नेता अटक!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी अहमदाबाद सायबर गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये आम आदमी पार्टीचा नेता आरबी बारिया आणि कांग्रेस नेता जिग्नेश मेवाणी यांचा पीए सतीश वनसोला याचा समावेश आहे.अमित शहा यांच्या बनावट व्हिडीओ प्रकरणी सातत्याने कारवाई केली जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नुकताच एक बनावट व्हिडिओ व्हायरल झाला होता.भाजप जिंकल्यानंतर एससी, एसटी यांचं आरक्षण रद्द केले जाईल, असे या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा बोलताना दिसत आहेत.मात्र, अमित शाह यांनी आपल्या भाषणात असे काहीही म्हटले नाही.हा व्हिडिओ एडिट करुन व्हायरल केला जात असल्याचे नंतर कळले.त्यानंतर भाजपकडून कारवाईची मागणी करण्यात आली.वास्तविक हा व्हिडीओ २०२३ मधला तेलंगणा येथील आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाषणामध्ये मुस्लिम कोटा संपवण्याबद्दल बोलत होते.

हे ही वाचा:

टी- २० विश्वचषकासाठी भारताचे शिलेदार ठरले; १५ खेळाडूंची घोषणा

कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने रेवण्णावर का कारवाई केली नाही ?

“काँग्रेसची ओळख म्हणजे विश्वासघात”

‘पंतप्रधान, देवेंद्रजींबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंचा पुन्हा तोल गेलाच’

दरम्यान, अमित शहा यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी अहमदाबाद सायबर क्राईम टीमने दोघांना ताब्यात घेतले आहे.सतीश वनसोला आणि आरबी बारिया असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.अटक करण्यात आलेला सतीश वनसोला हा काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांचा पीए आहे तर दुसरा आरबी बारिया हा आम आदमी पार्टीचा दाहोद जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे.या दोघांनी गृहमंत्री अमित शहा यांचे एडिट केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

Exit mobile version