भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा आणि निर्णायक वनडे सामना विशाखापट्टणममधील एसीए–व्हीडीसीए स्टेडियमवर सुरू आहे. सामना कोण जिंकणार हे काही तासांत स्पष्ट होईल, पण एक गोष्ट आधीच ठरली — अखेर २० सामन्यांपासून सुरु असलेली भारताची ‘टॉस हारण्याची’ परंपरा संपली! कप्तान केएल राहुलने शेवटी नशीबाची साथ मिळवत टॉस जिंकला.
टॉस जिंकण्यासाठी राहुलचा अनोखा टोटका!
रांची वनडेनंतर रायपूरमध्येही टॉस हरल्याने निराश झालेल्या केएल राहुलने या वेळी एक वेगळाच टोटका वापरला. नेहमीप्रमाणे उजव्या हाताने नव्हे, तर डाव्या हाताने नाणे उडवले. बावुमा यांनी ‘हेड्स’ अशी हाक दिली… आणि नाणे ‘टेल’ आले!
राहुलचा टोटका एकदम यशस्वी ठरला.
टॉस जिंकल्यानंतर राहुल अतिशय आनंदी दिसत होता.
भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२० सामन्यांनी तुटली परंपरा
भारताने शेवटचा टॉस विश्वकप २०२३सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जिंकला होता. त्यानंतर सलग 20 सामन्यांत टॉस भारताच्या वाट्याला आला नव्हता.
सीरिजची स्थिती
-
पहिला वनडे (रांची): भारत १७धावांनी विजयी
-
दुसरा वनडे (रायपूर): दक्षिण आफ्रिकेची विक्रमी धावांचा पाठलाग करत भव्य विजय
तिसरा सामना निर्णायक असल्याने दोन्ही संघ विजेतेपदासाठी झुंज देत आहेत. दोन्हींचा खेळ आतापर्यंत प्रभावी राहिल्याने ही लढत अत्यंत रोमांचक होण्याची चिन्हे आहेत.
भारताची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), रविंद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन
रेयान रिकेल्टन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), मैथ्यू ब्रीट्जके, एडेन मार्करम, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जानसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमॅन.
