चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता यांची पक्षातून हकालपट्टी!

पक्षातील सहकाऱ्यांवर केले होते आरोप 

चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता यांची पक्षातून हकालपट्टी!

भारतीय राष्ट्र समितीचे (BRS) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची मुलगी आणि आमदार के. कविता यांना पक्षाविरोधी वक्तव्य केल्यामुळे पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. आमदार के कविता यांनी अलीकडील काळात पक्ष नेतृत्वावर आणि निर्णय प्रक्रियेवर सार्वजनिकरित्या टीका केली होती, ज्यामुळे पक्षात असंतोष निर्माण झाला. या वक्तव्यांना पक्षविरोधी मानत, बीआरएसने शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना निलंबित केल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

खरे तर, आमदार के कविता यांनी त्यांचे चुलत भाऊ, माजी सिंचन मंत्री टी हरीश राव आणि माजी खासदार जे संतोष राव यांच्याविरुद्ध स्फोटक आरोप केले होते. यानंतर याप्रकरणी के चंद्रशेखर राव यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. यानंतर पक्षाने कारवाई करत आमदार के कविता यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्ष प्रमुख केसीआर यांनी म्हटले की, त्यांच्या (के कविता) अलीकडील टिप्पण्या आणि कृती पक्षाच्या धोरणांच्या आणि तत्वांच्या विरोधात आहेत. दरम्यान, कविता यांचे निलंबन हे बीआरएसमधील एक मोठे घडामोडी आहे, जे अशा वेळी घडत आहे जेव्हा पक्ष आधीच अंतर्गत आव्हानांना तोंड देत आहे. 

निलंबनाच्या एक दिवस आधी, आमदार के. कविता यांनी पक्षातील सहकाऱ्यांवर थेट आरोप करून बीआरएसमध्ये खळबळ निर्माण केली होती. त्यांनी आपल्या वडिलांवर म्हणजेच केसीआर यांच्यावर “भ्रष्ट” असा ठपका लावल्याचा आरोप वरिष्ठ नेते टी. हरीश राव आणि माजी खासदार मेघा कृष्णा रेड्डी यांच्यावर केला होता. तसेच, हरीश राव आणि खासदार संतोष कुमार यांनी तिला पक्षातून बाजूला करण्यासाठी कट रचल्याचाही आरोप केला होता.

हे ही वाचा : 

कुख्यात गुन्हेगार अशद उर्फ अर्शदला अटक

कडूलिंबाच्या पानात दडले आहेत अनेक गुण

भूस्खलनानं संपूर्ण गाव उद्ध्वस्त, १००० लोकांचा मृत्यू, केवळ एक जीवित!

बलात्काराच्या आरोपातील ‘आप’ आमदार पोलिसांवर गोळीबार करून कोठडीतून फरार!

२२ ऑगस्ट रोजी कविता यांना तेलंगणा बोग्गु घनी कर्मिका संघम (TBGKS) च्या मानद अध्यक्षपदावरून अचानक काढून टाकण्यात आले होते. त्यांनी पक्षातील काही लोकांवर त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला आणि त्यांची हकालपट्टी राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले होते.

Exit mobile version