मुंबई आणि परिसरात मशिदींच्या नावावर लँड जिहादचे कारस्थान

किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित कारवाईची मागणी

मुंबई आणि परिसरात मशिदींच्या नावावर लँड जिहादचे कारस्थान

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी लँड जिहादच्या प्रकरणांविरोधात आवाज उठवला आहे. मशिदींच्या नावाने मोठ्या प्रमाणात जमीन बळकावण्याचे कारस्थान मुंबई, भाईंदर, नवी मुंबई, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, पनवेल अशा भागांमध्ये सुरू असल्याची बाब किरीट सोमय्या यांनी निदर्शनास आणून दिली आहे. तसेच या महाराष्ट्रात अशा अनधिकृत भोंग्याला पोलिस परवानगी नको कठोर नियमावली बनवण्यासाठी आणि कारवाईसाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

मुंबई, भाईंदर, नवी मुंबई, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, पनवेल भागांमध्ये मशिदींच्या नावाने मोठ्या प्रमाणात जमीन बळकावण्याचे कारस्थान सुरू आहे. पोलिसांनी अशा अनधिकृत मशिदींमध्ये भोंग्यासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कठोर नियम बनवावेत आणि अनधिकृत मशिदींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी घाटकोपर आणि भांडुपमधील २५ अनधिकृत मशिदी आणि भोंग्यांची माहिती दिली आहे.

पत्रात किरीट सोमय्या यांनी या मशिदींच्या बाबतीतील काही निरीक्षणेही नोंदवली आहेत. मोठ्या प्रमाणात मशिदीच्या नावाने अनधिकृत घरे, झोपड्या, चाळी, वाढीव बांधकाम होत असून त्यावर भोंगे लावून ती मशीद असल्याचे सांगून महापालिका आणि पोलीस यांच्या निर्बंधांतून वाट काढण्याचा डाव साधला जात आहे. या माध्यामातून जमिनी बळकावल्या जात आहेत.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, अनेक ठिकाणी सरकारी जमिनीवर, मैदानावर, हरित पट्ट्यावर किंवा समुद्राच्या लगतच्या खारफुटीवर अनधिकृत बांधकाम करून त्याला मशिदीचे नाव देण्यात येते आहे. यावर भोंगेही लावले जातात पण बहुतेक मशिदींसाठी पोलीस आणि महापालिकेकडून भोग्यांची परवानगी घेतली जात नाही. घाटकोपर (पश्चिम) येथील उदाहरण देताना किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, पोलीस ठाण्याला भेट दिली असता पोलीस अधिकाऱ्यांनी एकाही मशिदीच्या भोंग्याला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले. यावर आक्षेप घेताच पुढच्या चार दिवसांत ३३ मशिदीच्या प्रतिनिधींनी पोलीस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज दिला. पोलीस परवानगी देताना एका वेळेला ३० दिवसांसाठी परवानगी देतात, सकाळी ६ ते १० वाजेपर्यंतची ही परवानगी असते. परवानगीचे दर ३० दिवसांनी नूतनीकरण केले जाते; म्हणजेच स्थिती अशी आहे की, वर्षाचे ३६५ दिवस सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मशिदीवरील भोंग्यांना परवानगी. तसेच पुढे त्यांनी नमूद केले आहे की, परवानगी देताना पोलीस ठाणे कोणत्याही प्रकारचे पुरावे, मशिदीची मालकी, अधिकृतता, अनधीकृतता, मशिद आहे कि नाही का फक्त दोन-चार खोल्या उभारून उभं करण्यात आलेले बेकायदेशीर बांधकाम आहे, असा कोणताही तपास किंवा चौकशी केली जात नाही.

हे ही वाचा:

नागपूर हिंसाचारातील मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर

गाझाच्या नास्सेर हॉस्पिटल संकुलात लपलेल्या दहशतवाद्यांवर इस्रायलचा हल्ला

नागपूर हिंसाचारातील मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर चालणार बुलडोझर?

एकनाथ शिंदेंबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याने कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला!

किरीट सोमय्या यांनी पुढे पत्रात म्हटले आहे की, मशिदीवरील लावण्यात आलेले भोंगे हे बाहेरच्या दिशेने असतात म्हणजेच आसपासच्या लोकांना आवाज ऐकवण्यासाठी असतात. या भोग्यासंबंधी आलेल्या तक्रारीची नोंदही घेतली जात नाही. तसेच भोग्यांचा आवाज किती मोठा आहे त्याची कधीही चौकशी अथवा तपासणी केली जात नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) किंवा त्यांचे अधिकारी या ध्वनी प्रदूषणाची चौकशी करत नाहीत, कार्यवाही करत नाहीत. जी स्थिती घाटकोपर (पश्चिम) ची आहे, तीच अन्य पोलीस स्टेशनची आहे किंवा बहुतेक ठिकाणच्या मशिद, भोगे त्यांच्या परवानगी, कायदेशीर बेकायदेशीरपणा हे महाराष्टात जवळ-जवळ सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आहे. यासाठी पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांना निर्देश द्यायला हवे, गृह मंत्रालय आणि पर्यावरण मंत्रालय यांनी कठोर नियमावली, Standard Operating Practice (SOP) तयार करायला हवी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Exit mobile version